ब्लॉग म्हणजे काय ? आणि ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
ब्लॉग म्हणजे काय? What is blogging?
ब्लॉगिंग साठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या? | Which things are required for blogging?
ब्लॉग सुरु करण्यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. या गोष्टी तुम्हाला तुमच्या ब्लॉगिंगच्या प्रवासात उपयुक्त ठरतील.
1) मोबाईल/ लॅपटॉप किंवा कॉम्पुटर:- आता पाहा, प्रत्येकाकडे लॅपटॉप किंवा कॉम्पुटर असेल असं नाही. पण जेव्हा तुम्ही वेबसाईट बनवता तेव्हा तुम्हाला या गोष्टीची आवश्यकता असते. कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला मोबाईल वरून करता येईल असं नाही. Theme settings असो किंवा plug-in असो त्या साठी तुम्हाला लॅपटॉप किंवा कॉम्पुटर ची गरज असते. मी असं म्हणत नाही की तुम्ही नवीन घ्या, पण जर कोणाकडे असेल तर त्यांच्या मदतीने तुम्ही वेबसाईट बनवा. कारण नंतर तुम्ही मोबाईल वरून ही ब्लॉग लिहून पोस्ट करू शकता. मी हे वेबसाईट लॅपटॉप वरून बनवली, आणि हा ब्लॉग ही मी मोबाईल वरून लिहीत आहे. मोबाईल वरून ब्लॉग लिहायचा एक फायदा आहे की तुम्ही कुठे ही असाल तरी तुम्ही ब्लॉग लिहू शकता. पण मी तुम्हाला suggest करेल की जेव्हा तुमची कमाई चालू होईल तेव्हा लॅपटॉप किंवा कॉम्पुटर येईल एवढे पैसे आले की नक्की घ्या. कारण त्याचा तुम्हाला लाँग टर्म साठी उपयोग होईल.
2) उत्तम इंटरनेट कनेक्शन:- ब्लॉगिंग सुरू करताना मोबाइल, लॅपटॉप जितके महत्वाचे आहेत, तेवढंच इंटरनेट ही महत्वाचं आहे. ब्लॉग पब्लिश करताना, अपडेट करताना, फोटो अपलोड करताना उत्तम इंटरनेट असणं खूप महत्वाचं आहे. ब्लॉगिंग एक अशी गोष्ट आहे ज्यावर तुम्ही कितीही काम केलं तरी ते कमीच आहे. कारण की एका वेळी तुम्हाला अनेक गोष्टी करायच्या असतात. जर तुमच्याकडे मर्यादित इंटरनेट असेल, तर तुमच्या कयामत ही अडथळा येऊ शकतो. यामुळे WIFI असणं गरजेचं आहे.
3 ) उत्तम ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म:- ब्लॉग सुरु करायचा म्हणलं तर ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म तर हवाच. Blogger.com आणि WordPress.org हे दोन अतिशय प्रसिद्ध ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहेत. यावर तुम्ही ब्लॉगिंग सुरु करू शकता. जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला ब्लॉगिंग बद्दल काही माहीत नाही, तर तुम्ही ब्लॉगर ब्लॉगरवर सुरुवात करा. कारण हा प्लॅटफॉर्म फ्री आहे आणि यासोबत तुम्हाला .blogspot.com हे subdomain मिळतं. परंतु WordPress.org मध्ये तुम्हाला स्वतःची hosting ani domain लागतं की जे किमान साडे तीन हजारापर्यंत मिळतं. जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही वर्डप्रेस वर ही सुरुवात करू शकता. यावर आपण लवकरच एक डिटेल आर्टिकल publish करणार आहोत.
4 ) SEO ची माहिती:- ब्लॉग सुरु करत असाल, तर वेबसाईट रँक करणं हे ही तुमचं ध्येय असायला हवं. या साठी seo तुम्हाला मदत करते. हे सॉफ्टवेअर नाहीये किंवा ॲप ही नाहीये. तुम्हाला काही keywords शोधून त्यानुसार ब्लॉग लिहायचा आहे. जेणेकरून कोणी जर त्या keywords ला गूगलला शोधले तर तुमचा आर्टिकल वाचकांना दिसेल.
5 ) Niche निवडणे:- Niche म्हणजे तुम्हाला कोणत्या विषयावर ब्लॉग लिहायचा आहे . ब्लॉग सुरु करताना तुम्हाला त्या विषयाबद्दल माहिती असायला हवी. कारण काय होतं की यामुळे तुम्ही आणखीन चांगला ब्लॉग लिहू शकता. त्यामुळे तुम्हाला ज्या विषयाबद्दल माहिती आहे त्याविषयीच ब्लॉग सुरु करा म्हणजे तुम्हाला प्रभावी ब्लॉग लिहिण्यात मदत होईल.
6) सातत्य:- तुम्हाला कोणतीही गोष्ट साध्य करायचं असेल तर तुम्हाला ते काम सातत्याने करणे गरजेचे आहे. तुम्ही आज एक ब्लॉग लिहिला आणि महिनाभर काहीच केलं नाही, आणि मग तुमची अपेक्षा असेल की तुमची लाखात कमाई होईल तर हे साफ चुकीचं आहे. असं नाही की नियमित ब्लॉग पोस्ट करणे म्हणजेच सातत्य होय. ब्लॉगिंग करताना ब्लॉग टॉपिक शोधणे, keyword research करणे, पोस्टर बनवणे, प्रमोशन करणे, Seo करणे अशी खूप कामं असतात. महिन्याला ३० ब्लॉग पोस्ट करण्यापेक्षा १० करा पण ते उत्तम असायला हवेत ज्याने तुमच्या वाचकांना मदत होईल, माहिती मिळेल.
या गोष्टी तुम्हाला ब्लॉग सुरु करण्यासाठी आवश्यक आहेत. जर तुमचा असा समज असेल की आज ब्लॉग सुरू केला आणि उद्या कमाई चालू तर असं ही नाहीये. ब्लॉग सुरु करण्यासाठी तीन गोष्टी लक्षात ठेवायला हव्या:-
१) सातत्याने काम करा.
२) सुरुवातीला कमाई कडे लक्ष न देता उत्तम ब्लॉग लिहिण्यावर भर द्या.
३) एका रात्रीत लाखोंची कमाई होणार नाही, त्यामुळे सुरुवातीलाच कष्ट घ्या.
या सगळ्या गोष्टी नेहमी लक्षात ठेऊन मगच ब्लॉगिंग ची सुरुवात करा. जेव्हा आपण ब्लॉगिंग करायचा विचार करतो तेव्हा काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. ब्लॉगिंग तुम्ही तेव्हाच सुरू करू शकता जेव्हा तुम्हाला ब्लॉगिंगसाठी तुमचा योग्य तो विषय मिळेल. यालाच आपण blogging niche असे म्हणतो. blogging niche म्हणजे काय ते पूढीलप्रमाणे:-
ब्लॉगिंग निश म्हणजे काय? What is blogging niche?
नमस्कार मित्रांनो. याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये आपण ब्लॉगिंग म्हणजे काय? आणि ब्लॉगिंग करताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते पाहिलं. आता ब्लॉग सुरू करायचा म्हणलं तर त्यासाठी योग्य विषय निवडणं ही आवश्यक असतं. कारण की काही वेळा आपण योग्य विषय निवडत नाही, आणि मग ब्लॉगिंग करताना आपल्याला अनेक अडचणी येतात. त्यामुळे योग्य विषय निवडणं आवश्यक आहे. तर आपण आजच्या या ब्लॉग मध्ये ब्लॉगिंग निश म्हणजे काय? आणि निश कशी निवडायची हे पाहुयात.
blogging niche meaning:-
what is micro niche?
How to select right blogging niche for your blog?
Conclusion:-
निश निवडताना केवळ traffic चा विचार करू नका. कारण तुमचा कंटेंट म्हणजेच तुम्ही लिहिलेला आर्टिकल हा त्या ब्लॉगचा प्राण असतो. विना अनुभव आणि ज्ञान नसताना लिहिलेला ब्लॉग प्रभावी बनत नाही ज्यामुळे ट्रॅफिक यायला अडचणी येतात, आणि लोंग टर्म साठी ही हा ब्लॉग चालवणं अवघड होतं. तुमची निश भले trending नसो, पण जर त्यावर तुम्ही उत्तम आर्टिकल लिहिणार असाल तर नक्कीच तुमच्या ब्लॉगवर ट्रॅफिक यायला मदत होईल.
तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, तर आपल्या ब्लॉगर मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद.