10 profitable blogging niches for beginner
ब्लॉगिंग सुरू करताय? आणि कळत नाहीये की कोणत्या विषयावर ब्लॉग सुरू करावा? तुमची ही अडचण दूर करायला आजचा हा आर्टिकल आहे. आपण सगळे ब्लॉगिंग सुरू करतो, ते पैसे कमवण्यासाठी. पण जर तुम्हाला तुमच्या ब्लॉगचा विषय निवडता येत नसेल , पण ब्लॉग सुरू करायचा आहे? तर हा आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा.
ब्लॉग सुरू करताना आपण ज्या विषयावर ब्लॉग लिहितोय, त्यातून आपल्याला उत्तम पैसे कमवता आले पाहिजे. पण ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, की ब्लॉगिंग सुरू करताना प्रत्येकालाच आपला कोणता विषय पक्का आहे आणि त्यावर आपण लिहू शकतो हे माहीत नसतं. पण अशी लोकं सुरुवातीला वेगळ्या विषयावर काम करून त्यातून ही पैसे कामवू शकतात. अशा लोकांनी पूढील विषयावर काम करावे:-
10 profitable niches for beginners:-
- Self-help blog:- माणूस देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहत असो, त्याला कोणत्या न कोणत्या मदतीची गरज असू शकते. यू ट्यूब वर विडियो आहेतच, पण लोकं ब्लॉग वर असे आर्टिकल शोधतात ज्याने त्यांची मदत होईल. जसे की " How to do time management?" किंवा "Home decor ideas" इत्यादि असे कितीतरी विषय आहेत ज्याद्वारे तुम्ही लोकांची मदत करू शकता. त्यामुळे नवीन लोकांनी या ब्लॉगवर नक्की काम करावं. आपण म्हणतो की youtube आहे तर ब्लॉग कोण वाचेल? पण असं अजिबात नाहीये. लोकांना to the point solution हवं असतं. Youtube वर काही वेळा समस्या व्यवस्थित सोडवल्या जात नाही. यामुळे लोकं जितक्या सहज उत्तरं शोधता येईल याचा प्रयत्न करतात. यामुळे self-help ब्लॉग हा एक उत्तम पर्याय आहे.
- Food blog:- फूड ब्लॉगिंगमध्ये स्पर्धा खूप कमी आहे. जर तुम्ही तुमच्या मातृभाषेत लिहीत असाल तर याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होऊ शकतो. यामध्ये तुम्ही तुम्हाला ज्या रेसिपी येत असतील त्या लिहून पोस्ट करू शकता. इंग्रजी मध्ये ही तुम्ही लिहू शकता. जर तुम्ही नवीन असाल तर या निश वरतीही तुम्ही काम करू शकता.बऱ्याच जणांना food blogging साठी youtube channel सुरू करावा वाटतं. परंतु काही अडचणी जसे की जागेची कमी यामुळे त्यांना तो करता येत नाही. ब्लॉगिंग अशा लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. आणि म्हणूनच तुम्ही तुम्हाला ज्या प्रकारचे पदार्थ यूट्यूब वर दाखवावे वाटतात, तेच तुम्ही लिखित स्वरूपात तुमच्या ब्लॉगवर ही अपलोड करू शकता.
- Product review blog:- लॅपटॉप असो, मोबाइल असो, किचन मधली कोणतीही वस्तु असो, जेव्हा आपण ती वस्तु घ्यायला जातो तर ती चांगली आहे का? आपल्याला परवडणारी आहे का? हे जसं आपण पाहतो, तसच इतर लोकं ही पाहतात. वस्तु कोणतीही असो, लोकं त्याचा रिव्यू नक्की पाहतात. तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या वस्तूंचा रिव्यू लिहून तुमच्या ब्लॉग वर पोस्ट करू शकता. हा ब्लॉग तुम्हाला सर्वात जास्त नफा कमवून देऊ शकतो, कारण तुम्ही यामध्ये AdSense सोबतच affiliate marketing द्वारे ही पैसे कमवू शकता.
- Educational blog:- आत्ताच्या काळात विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या ब्लॉग मध्ये तुम्ही योजना, scholarship, schemes, exam updates, syllabus, notes इत्यादि गोष्टी शेअर करू शकता. यात फक्त शैक्षणिक गोष्टी येतात असं नाहीये. तसेच जर तुम्हाला एखादी स्किल येत असेल तर त्याची ही माहिती तुम्ही ब्लॉगवर शेअर जारू शकता. कारण यामुळे फक्त तुमच्या ज्ञानात भर पडेल असं नाही, तर इतरांना ही त्याचा फायदा होईल. यामुळे तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना मदत कराल.
- Career blog:- करियर ब्लॉगमध्ये तुम्ही लोकांना करियर विषयी माहिती देऊ शकता. म्हणजे कोणत्या शाखेतून काय बनता येईल? CA होण्यासाठी काय करावं लागेल? upsc आणि mpsc मध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत, इत्यादि या सर्वाची माहिती तुम्ही यामध्ये देऊ शकता. आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे परंतु बेरोजगारीचे प्रमाण ही तेवढेच जास्त आहे त्यामुळे तुमचा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. एक तर तुमची कमाई ही चांगली होईल, आणि तरुणांना मार्गदर्शन ही मिळेल.
- Finance:- पैसे कामवणे जेवढे महत्वाचे असते तेवढेच आपले खर्च सांभाळून पैशाची बचत करणे ही महत्वाचे असते. बऱ्याच जणांना त्यांच्या सर्व गरजा भागून ही हातात पैसे उरेल एवढा पगार किंवा मिळकत असते. परंतु चुकीच्या नियोजनामुळे महिन्याच्या शेवटी हातात एकही रुपया टिकत नाही. अशा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही finance blog सुरू करू शकता. या ब्लॉग मध्ये तुम्ही SIP, Stock market, FD, RD, Savings, Pension scheme, Recurring इत्यादि गोष्टीवर लिहू शकता. पैसे गुंतवण्यासाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत का? यावर ही तुम्ही ब्लॉग लिहू शकता, तसेच बचतीचे कोणकोणते मार्ग आहेत या विषयावर ही तुम्ही लिहू शकता. हे ब्लॉग लिहिताना तुम्हाला Banking क्षेत्राचे ज्ञान असणे महत्वाचे आहे, तरच तुम्ही उत्तम आर्टिकल लिहू शकता.
- Fitness:- 2020 च्या कोविडपासून प्रत्येकजण आपली तब्बेत कशी छान राहील याकडे लक्ष देत आहे. तब्बेत छान होणं म्हणजे बारीक होणं नव्हे तर शारीरिकरित्या मजबूत होणं होय. लोकांना स्वतःची तब्बेत कशी छान ठेवता येईल? त्यांची रोगप्रतिकारक शक्ति कशी वाढेल? उत्तम आहार म्हणजे काय? व्यायाम व योग याबद्दलची माहिती, इत्यादि तुम्ही fitness blog मध्ये देऊ शकता. हा ब्लॉग मानवी शरीरासंबंधी असल्याने तुम्ही medical क्षेत्रात पारंगत असाल तरच हा ब्लॉग सुरू करावा. कारण त्यामध्ये अनेक गोष्टी अशा असतात ज्या सर्वसामान्य माणसाला लिहिता येणार नाही, आणि चुकीची माहिती देण्याचीही शक्यता असू शकते. यामुळेच तुम्ही जर fitness coach, doctor, dietitian, nutritionist, yoga expert, इत्यादि असाल तरच fitness ब्लॉग सुरू करा असा माझा सल्ला आहे.
- Technology:- Information and technology हे सध्या जास्त trend मध्ये आहात. बदलणाऱ्या काळाचा विचार केला तर विविध तंत्रज्ञान आजच्या काळात विकसित होत आहे. कित्येक जणांना तर या अपडेट बद्दल माहीत ही नसतं, आणि अशा लोकांसाठी तुम्ही Technology या विषयावर ब्लॉगिंग करू शकता. यामध्ये तुम्ही तंत्रज्ञानाच्या जगात असलेले नवीन अपडेट, नवीन कोणतं तंत्रज्ञान आले आहे किंवा येणार आहे? कोणतं तंत्रज्ञान (App) बंद होऊ शकतं, इत्यादि विषयी माहिती देऊ शकता. तरुणांमध्ये याची रुचि जास्त असते, तसेच यामध्ये तुम्हाला paid sponsorship ची संधी ही भेटू शकते. आणि हा
- Pets:- पाळीव प्राण्यांची आवड तर प्रत्येकालाच असते. त्यांच्यासाठी नवीन नवीन गोष्टी करणं, नवीन गोष्टी घेणं आणि नवीन पदार्थ त्यांना खायला घालणं हे प्रत्येक pet parent ला आवडतं. पण काही गोष्टी अशा असतात ज्याच्यासाठी आपल्याला आपल्या पाळीव प्राण्यासाठी करायच्या असतात, पण आपण माहितीच्या अभावे त्या करू शकत नाही. अशा pet parents साठी तुम्ही "Petting" या विषयावर ब्लॉग सुरू करू शकता. यामध्ये तुम्ही कुठल्याही पाळीव प्राण्याबद्दल सविस्तर माहिती देऊ शकता. त्या प्राण्याला कोणतं जेवण द्यावं? त्याची काळजी कशी घ्यावी? त्याच्यासाठी कोणत्या वस्तु घ्याव्यात? इत्यादि बद्दल तुम्ही माहिती देऊ शकता. पण जर तुम्ही प्राण्याच्या आजाराबद्दल माहिती देणार असाल तर तुम्हाला डॉक्टरच्या सल्ल्यानेच माहिती द्यावी लागेल. कारण कितीही केलं तरी हा त्या प्राण्याच्या जीवाचा प्रश्न आहे. Pet parents साठी तुमचा हा ब्लॉग अतिशय उपयुक्त ठरेल.
- Gardening:- भारतात म्हणा किंवा परदेशात! झाडे लावायची आवड ही प्रत्येकालाच असते. प्रत्येकाच्या घरात एक न एक रोपटे असतेच. यातूनच आणखीन झाडे लावण्याची इच्छा ही काही जणांच्या मनात उत्पन्न होते. जो माणूस सुरुवातीला gardening करतो त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जसे की:- कोणत्या ऋतुत कोणते झाड लावावे? कोणत्या झाडासाठी कोणती माती योग्य आहे? कोणते खत झाडासाठी योग्य आहे? इत्यादि. तर या प्रश्नांचे समाधान करण्यासाठी तुम्ही gardening या विषयावर ब्लॉग सुरू करू शकता. यामध्ये तुम्ही affiliate marketing द्वारे ही पैसे कमवू शकता, तसेच झाडांच्या विविध प्रजाती आहेत, त्यामुळे तुम्हाला blog post ideas ही अनेक भेटतील.
हे दहा असे विषय आहेत, ज्यावर तुम्ही सुरुवातीला ब्लॉग लिहू शकता. आणि असं नाहीये की या ब्लॉगचे काहीच फायदे नाहीयेत. हे ब्लॉग कायम चालणारे आहेत, यामध्ये विविध बदल ही होतात. आणि याची डिमांड ही आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल, तर या विषयवार नक्की सुरुवात करा. सुरुवातीला अडचणी येऊ शकतात पण त्या अगदी साहजिक आहेत, प्रत्येकाला येतात. या बब्लॉगिंग विषयाचे एक महत्व म्हणजे तुम्ही विविध मार्गांनी जसे की AdSense, paid promotion, affiliate marketing इत्यादि द्वारे पैसे कमवू शकता. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आमच्या सोबत संपर्क करू करू शकता. आशा आहे की आपल्याला आमचा ब्लॉग आवडला असेल.
धन्यवाद.