Most profitable blogging niche for 2024
2024 सुरू होतंय आणि तुम्ही जर ब्लॉगिंगचा विचार करत असाल, तर हा आर्टिकल नक्की वाचा. या वर्षी ब्लॉगिंग नाही जमलं, तर वाईट वाटून घेऊ नका. अजून दीड महिना हातात आहेच. तर या दीड महिन्यात अशा विषयावर काम करा की जिथे तुम्ही फक्त AdSense द्वारेच नाही, तर इतर कितीतरी पद्धतीने कमवू शकता. एका ब्लॉगरचा ब्लॉगिंग सुरू करण्याचा मुख्य उद्देश हा एक तर AdSense द्वारे कमावण्याचा असतो किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा असतो. ही niche अशी आहे की यात तुम्ही या दोन्ही पद्धतीने कमवू शकता. ही niche दुसरी कोणती नसून आहे Food niche किंवा Food blogging.
What is food blogging? Role of a food blogger.
यूट्यूब आणि instagram वर तुम्हाला अनेक विडियो पाहायला मिळतील रेसिपीचे, किंवा प्रॉडक्ट रिव्यूचे. ज्या गोष्टी एक फूड ब्लॉगर विडियोद्वारे करतो, त्याच तुम्हाला तुमच्या वेबसाइटवर आर्टिकल स्वरूपात लिहायच्या असतात. हा पर्याय त्यांच्यासाठी उत्तम आहे की ज्यांना चेहरा आणि आवाज न दाखवता पैसे कमवायचे आहेत. फूड ब्लॉगरचं मुख्य काम हे ज्यांना सोप्या भाषेत लोकांना पदार्थ बनवायला शिकवणे होय. तसेच जर एखादा मसाला असेल, किंवा kitchen संबंधी कोणत्या गोष्टी चांगल्या असतात, त्या घ्याव्या या बाबतीत इतरांना मार्गदर्शन करणे होय.
Type of food blogging:-
आर्टिकल स्वरूपातही तुम्ही पूढील प्रकारे फूड ब्लॉगिंग करू शकता:-
1) Recipe based blogs:- Recipe based blog हा ब्लॉगिंगचा सर्वात प्रसिद्ध प्रकार आहे. यामध्ये तुम्ही विविध प्रकारच्या पाककृती कशा बनवायच्या? त्याच्या साठी लागणारे साहित्य कोणते? तसेच त्यासाठी लागणाऱ्या वस्तु? व टिपा, इत्यादिबद्दल ब्लॉगिंग करू शकता. यामध्ये तुम्ही प्रत्येक पाककृतीची खासियत किंवा वैशिष्ट्य काय आहे? याबद्दल लिहू शकता. Recipe based blog मध्ये तुम्ही विविध प्रकारच्या पाककृती बद्दल तुम्ही लिहू शकता. यासाठी तुम्ही पूढील विषयावर ब्लॉग लिहू शकता, ते विषय पुढीलप्रमाणे:- Vegetarian recipe, Vegan recipe, Glueten-free recipes, PCOD/PCOS Recipes, etc. या विषयांवर लिहून तुम्ही विविध मार्गांनी पैसे कमवू शकता, ते मार्ग पुढीलप्रमाणे:- Affiliate marketing, adsense, sponsered post, e-book.
2) Restaurant review:- आपण विविध हॉटेल मध्ये जेवण करायला तर जातोच, पण जर तिथलं जेवण व्यवस्थित नसेल तर आपले पैसे तर वाया जातातच. त्यामुळे ते हॉटेल कितीही नावजलेले असो, तरी ही तिथे जाण्यात अर्थ नसतो. पण असे काही हॉटेल असतात जिथे जेवण चांगलं आहे पण त्या हॉटेल बद्दल खूप कमी जणांना माहीत असतं. तर या विषयावर तुम्ही ब्लॉगिंग करू शकता. यामध्ये तुम्ही साधारणपणे विविध हॉटेल मध्ये जाऊन तिथले पदार्थ घेऊन ते कसे आहेत? त्याची चव कशी आहे? त्या हॉटेल मध्ये स्वच्छता आहे की नाही? पदार्थांची किंमत किती आहे? त्याचा पत्ता, इत्यादि प्रकारची माहिती तुम्ही ब्लॉग मध्ये लिहू शकता. पूढील विषयावर ही तुम्ही ब्लॉग लिहू शकता, ते पुढीलप्रमाणे:- Budget friendly hotels, best hotel for lunch, best 5 star hotels, etc. या प्रकारच्या ब्लॉगिंगद्वारे तुम्ही पूढील मार्गांनी कमवू शकता जसे की:- Adsense, sponserd post, partnership, affiliate marketimg.
3) Food photography:- विविध हॉटेल आपले social media account बनवतात जेणेकरून ते जास्तीत जास्त कस्टमर आपल्या हॉटेल मध्ये आणता येतील. परंतु फोटो काढायची योग्य पद्धती माहीत नसते त्यामुळे त्यांचे social media account grow होत नाही. अशा लोकांसाठी तुम्ही Food Photography या विषयावर ब्लॉग लिहू शकता. या मध्ये तुम्ही पूढील विषयावर ब्लॉग लिहू शकता जसे की:- Tips and tutorial for food phorography, DIY Set up for your restaurants social media account, editing tips, etc. या ब्लॉगिंगद्वारे तुम्ही पूढील मार्गानी पैसे कमवू शकता:- Adsense, sponserd post, partnership, affiliate marketimg.
4) Cultural or regional cuisine:- विविध राज्यांमध्ये, विविध शहरात, विविध गावात, विविध देशात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाल्ले जातात. भारतीयांना वाटतं की अमेरिकेचे लोक फक्त ब्रेड खातात आणि अमेरिकेतील लोकांना वाटतं की भारतीय फक्त भातच खातात. हा एक गोड गैरसमज तर आहेच. पण आपल्याला विविध देशातल्या पदार्थ संस्कृतीची माहिती नसते. Cultural or regional cuisine blog मध्ये तुम्ही मुख्यतः खाद्य संस्कृतीबद्दल लिहू शकता. जसे की, कोणत्या देशात अथवा कोणत्या राज्यातला सर्वात जुना पदार्थ कोणता? विविध प्रदेशातील खास पदार्थ कोणता? इत्यादि विषयावर तर तुम्ही लिहू शकता. यामध्ये तुम्ही पूढील प्रकारे पैसे कमवू शकता:- Adsense, sponserd post, partnership, affiliate marketimg.
5) Health and wellness:- सध्याच्या काळात बदलत्या जीवनमानामुळे आपण विविध प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक व्याधींचा सामना करत आहोत. अशा वेळी आपला आहार योग्य असणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. pcod सारख्या समस्याचा महिलांना त्यांच्या अयोग्य आहार आणि राहणीमनामुळे किंवा जीवनशैलीमुळे सामना करावा लागतो, आणि म्हणून डॉक्टर ही सहसा आपल्याला आहार योग्य ठेवायला लागतात. आणि याच विषयावर तुम्ही ब्लॉग लिहू शकता. ज्यामध्ये तुम्ही स्वादिष्ट आणि सकस आहाराबद्दल माहिती लिहून त्याच्या पाककृती ही पोस्ट करू शकता. तुम्ही पूढील विषयावर ब्लॉग लिहू शकता:- PCOD recipes, harmone friendly recipes, keto food, low carb recipes, low fat recipes, sugar free recipes, etc. यामध्ये तुम्ही पूढील मार्गांनी पैसे कमवू शकता, जसे की:- Adsense, sponserd post, partnership, affiliate marketimg.
6) Food and travel blogging:- बरेच लोक अनेक ठिकाणी फिरतात, प्रवास करतात पण तुम्हाला माहीत आहे का की बऱ्याच लोकांना एक समस्या सातत्याने भेडसावते की प्रवासात जास्त काळ टिकेल असे पदार्थ कोणते बनवावे? कारण प्रवास करताना जर जेवणाचं योग्य ठिकाण नाही भेटलं तर प्रवास करणं आणखीन कठीण जाते. त्यामुळे तुम्ही प्रवासात नेता येतील व जास्त काळ टिकतील अशा पदार्थांच्या पाककृती आपल्या ब्लॉगमध्ये शेअर करू शकता. याच्यामध्ये तुम्ही पूढील प्रकारे पैसे कमवू शकता:- Adsense, sponserd post, partnership, affiliate marketimg.
7) Food science and techniques:- स्वयंपाक बनवणं ही केवळ कला नाही तर हे एक विज्ञान आहे. बऱ्याच जणांना स्वयंपाक बनवताना किंवा नवीन पदार्थ बनवताना काही अडचणी येतात. जसे की इडली बनवताना पीठ आंबत नाही, किंवा केक नेहमीच कच्चा आणि करपलेला राहतो. तर फूड ब्लॉगिंग म्हणजे केवळ रेसीपी शेअर करणं नाही, तर रेसीपी बिघडू न देता चांगली कसं बनवणं? हे ही आहे. म्हणून तुम्ही food science अँड techniques वर ब्लॉग लिहू शकता. ज्यामध्ये तुम्ही पूढील विषयावर ब्लॉग लिहू शकता:- Baking chemistry, fermentation techniques, food improvement techniques, etc. यामध्ये तुम्ही पूढील प्रकारे पैसे कामवू शकता:- E-book, course, workshop, Adsense, sponserd post, partnership, affiliate marketimg.
8) Meal prep and budget cooking:- बरेच लोक हे हॉस्टेलमध्ये राहतात,ऑफिसला जातात, किंवा कॉलेजला जातात. अशावेळी healthy खाणं ही महत्वाचं असतं, कारण बरेच लोक junk food कडे वळतात आणि त्यामुळे ही त्यांच्या तब्बेतीवर परिणाम होतो. जितका वेळ महत्वाचा आहे, तितकीच तब्बेत ही महत्वाची आहे. म्हणून तुम्ही Meal prep and budget cooking या विषयावर ब्लॉग लिहू शकता. यामध्ये साधारणपणे कमी वेळात व कमी खर्चात बनणाऱ्या पदार्थांची पाककृती लिहू शकता. यासोबतच तुम्ही पूढील विषयावर ब्लॉग लिहू शकता:- Student-friendly meal, Family meal prep, minimal/less ingrident meals prep, etc. यामध्ये तुम्ही पूढील पद्धतीने पैसे कमवू शकता:- Printable meal plan, recipe book, partnership with brands.
9) Food for special ocassion:- आपण वेगवेगळे सण साजरे करतो, किंवा आनंदाच्या गोष्टी साजऱ्या करण्यासाठी पार्टी ही करतो. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. याच विषयावर तुम्ही ब्लॉग मध्ये लिहू शकता. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या सण समारंभात कोणते पदार्थ बनवावे? पार्टीसाठी कोणते पदार्थ बनवावे?सुट्टीमध्ये कोणते पदार्थ बनवावे? बर्थडेसाठी कोणते पदार्थ बनवावे? इत्यादि गोष्टीवर ब्लॉग लिहू शकता. यामध्ये तुम्ही पूढील प्रकारे पैसे कमवू शकता:- Publishing E-book, Sponsored post, workshop, etc.
10) Sustainable and Ethical food:- आपल्या कडे सहसा अशा गोष्टी तर होतातच की पदार्थ बनवताना समान वाया जातं, किंवा नॉन व्हेजच्या सवयीमुळे बऱ्याच प्राण्यांची हत्या ही होते. तर या अशा काही वाईट गोष्टी थांबवण्यासाठी तुम्ही Sustainable and Ethical food या गोष्टीवर ब्लॉग लिहू शकता. यामध्ये तुम्ही साधारणपणे गोष्टी वाया न घालवता पदार्थ कसा बनवल? नॉन व्हेज सारखेच व्हेज पदार्थ त्याच चवीचे कसे बनवाल? plant based meal, etc. विषयावर तुम्ही ब्लॉग लिहू शकता. एवढेच नाही तर तुम्ही पूढील विषयावर ही ब्लॉग लिहू शकता:- Organic recipes, seasonal cooking or recipes, ethical product reviews, etc. यामध्ये तुम्ही पूढी प्रकारे पैसे कमवू शकता:- collaboration with other eco-friendly brands, e-books, workshop, etc.
हे तर झाले ब्लॉगिंगचे प्रकार. फूड ब्लॉगिंग हा एक असा विषय आहे ज्यात तुम्ही अनेक प्रकारे पैसे कमवू शकता. जितके पैसे कमावण्याचे मार्ग जास्त तितकी कमाई जास्त. म्हणूनच फूड ब्लॉगिंग हा अतिशय फायद्याचा ब्लॉगिंगचा विषय आहे. फूड ब्लॉगिंगद्वारे तुम्ही पूढील प्रकारे पैसे कमवू शकता.
Monetization opportunities for food bloggers:-
1) AdSense/ ad network:- ब्लॉगिंग करणाऱ्या प्रत्येकालाच कमाईचे हे साधन नक्कीच आवडते. तुमचा ब्लॉग गूगल AdSense द्वारे अप्रूव झाला तर गूगल तुमच्या ब्लॉगवर ads दाखवते. जो कोणी त्या ad वर क्लिक करेल, त्याद्वारे आपण पैसे कमवू शकतो. तसेच इतर ad network आहेत ज्याद्वारे आपण पैसे कमवू शकतो. फूड ब्लॉगिंगद्वारे तुम्ही या पद्धतीने पैसे कमवू शकता.
2) Affiliate marketing:- तुम्ही तुमच्या रेसिपीमध्ये एखादा मसाला वापरला आहे, आणि त्याची Affiliate link तुम्ही दिली, आणि त्याद्वारे जर कोणी मसाले घेतले, तर तुम्हाला त्याचं कमिशन मिळतं. यालाच affiliate marketing म्हणतात. ads सोबतच तुम्ही affiliate marketing द्वारे ही पैसे कमवू शकता.
3) Paid promotion/sponsor posts:- जर तुमच्या वेबसाइटवर खूप जास्त ट्रॅफिक येत असेल, तर ज्यांचं प्रॉडक्ट फूड संबंधित असेल, तर ते तुम्हाला त्यांच्या प्रॉडक्टचे प्रमोशन करण्यासाठी आणि त्या बद्दल लिहिण्यासाठी पैसे देतात. ज्याद्वारे त्यांचं प्रॉडक्ट विकलं जाईल. याद्वारे ही तुम्ही पैसे कमवू शकता.
4) Product selling:- ज्याद्वारे तुम्ही इतरांच्या प्रॉडक्ट बद्दल पोस्ट करू शकता, तसेच तुम्ही स्वतःचे ही प्रॉडक्ट विकू शकता. तुमच्या कंटेंट द्वारे तुम्ही मार्केटिंग करू शकता. जसे की मसाले, पापड, इत्यादि. यामधून तुम्हाला व्यवसायाची संधी मिळते, आणि तुमची कमाई ही होते.
5) Partnership:- Food industry मध्ये बरेच असे ब्रॅंड आहेत जे विविध प्रकारचे पदार्थ विकतात. तुम्ही ब्लॉगची niche आणि ब्रॅंड कोणते पदार्थ विकत आहे हे जर एकमेकांसोबत संबंधित असतील तुम्ही पार्टनर्शिप करून ही पैसे कमवू शकता.
तुम्ही एका वेळी या सर्व पद्धतीने ही पैसे कमवू शकता. त्यामुळेच फूड ब्लॉगिंगद्वारे तुम्ही जास्तीत जास्त पैसे कामवू शकता. जरी एका मार्गाने नाही कमावता आले तरी दुसऱ्या पद्धतीने तुम्ही पैसे कमवू शकता. जर तुम्हाला हा ब्लॉग यशस्वीरीत्या चालवायचा असेल, तर तुम्हाला पूढील 3 गोष्टी कटाक्षाने पाळायला पाहिजे.
3 Tips to make your food blog successful:-
1) Consistency:- हा ब्लॉग असो किंवा इतर कोणताही त्यात तुम्ही सातत्याने काम करायला हवं. तरच त्या ब्लॉगची वाढ चांगली होईल.
2) Patience:- ब्लॉग एका दिवसात वाढणार नाही, त्यामुळे धीर धरणे आणि सातत्य ठेवणे अतिशय आवश्यक आहे. कारण जर तुम्ही हे काम करताना धीर धरला, तरच तुम्हाला तुमचा ब्लॉग ग्रो होण्यासाठी मदत होईल.
3) Experiment:- ब्लॉग मध्ये नवनवीन प्रयोग करत रहा. म्हणजे एकाच प्रकारच्या रेसिपी पोस्ट न करता वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी ब्लॉगवर टाकत रहा. जेणेकरून तुमचा ब्लॉग ही वाढायला मदत होईल.
अशा प्रकारे तुम्ही तुमचा फूड ब्लॉग तुम्ही चालू करू शकता, आणि त्याद्वारे कमाई करू शकता. जर तुम्ही ब्लॉगिंगमध्ये नवीन असाल, आणि तुम्हाला या विषयामध्ये रस असेल तर तुम्ही नक्कीच फूड ब्लॉगिंग सुरू करू शकता. ब्लॉग वाढवण्यासाठी तुम्हाला Seo बद्दल माहिती असणे ही आवश्यक आहे. पूढील आर्टिकल मध्ये आपण Seo बद्दल जाणून घेऊयात.
आशा आहे की आपल्याला आमचा आर्टिकल आवडला असेल, धन्यवाद!