What is lifestyle blogging?
नमस्कार, आपण मागच्या आर्टिकल मध्ये नवीन ब्लॉगरने कोणकोणत्या विषयावर ब्लॉगिंग करावी याबद्दल जाणून घेतलं आहेच. Blogging niche निवडणं म्हणजे ब्लॉगिंग करण्याची पहिली पायरी आहे. कारण ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडणं हे अगदी सोप्पं आहे. पण नुसतं तेवढंच निवडणं आवश्यक नाही. जरी आपण प्लॅटफॉर्म निवडला तरीही त्यावर मुख्य जी गोष्ट आहे ती म्हणजे आपला कंटेंट.
What is lifestyle blogging? - Lifestyle blogging म्हणजे काय?
Lifestyle blog हे मुख्यतः जीवनशैलीशी संबंधित असतात. Lifestyle blogger हे लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून लोकांना योग्य ती माहिती मिळून त्यांची मदत होईल. आता हे ब्लॉग प्रसिद्ध का असतात? तर लोकांना रोजच नवनवीन समस्या असतात, ते सोडवण्यासाठी लोकं गूगलवर पाहत असतात. यूट्यूब पेक्षा ब्लॉग जास्त वाचतात कारण त्यांना सरसकट उत्तरं हवी असतात. मी ही हे अनुभवलं आहे. त्यामुळेच Lifestyle blogging ही एक कायम चालणारी किंवा Evergreen niche आहे.
या ब्लॉग मध्ये अनेक उपविषय म्हणजेच Micro niche आहेत. जीवनशैलीशी ब्लॉग असल्या कारणाने असे वेगवेगळे विषय आहेत त्यावर ब्लॉग बनवले जातात. आपण त्यापैकी मुख्य 5 Micro niche पाहुयात.
10 Lifestyle micro niche ideas:-
यामध्ये तुम्हाला लोकांची एखादी समस्या ओळखायची आहे, त्याबद्दल माहिती द्यायची आहे, आणि त्यावर काही उपाय सुचवायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटी तुमचा ब्लॉग त्यांच्यासाठी कसा उपयोगी आहे हे त्यांना सांगायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही Self blog सुरू करू शकता. या ब्लॉग मध्ये तुम्ही चनगली कमाई करू शकता.
2) Food blog :- याच्यामध्ये मुख्यतः तुम्हाला पदार्थ कसे बनवावे यावर लिहायचं असतं. आणि मुख्य म्हणजे या ब्लॉगिंग निश मध्ये स्पर्धा खूप कमी आहे. त्यातल्या त्यात तुम्ही तुमच्या मातृभाषेत जर हा ब्लॉग सुरू केला तर तुम्हाला याचा फायदा नक्की होईल. याशिवाय तुम्ही पदार्थांचा इतिहास ही सांगू अशक्त. यामुळे आपल्या राज्याची किंवा देशाची खाद्य संस्कृती आपल्याला कळायला मदत होते. यामध्ये तुम्ही affiliate marketing द्वारे ही पैसे कमवू शकता. Food niche ही एक उत्तम पर्याय आहे ब्लॉगिंग करण्यासाठी.
3) Travel blog:- आपल्या देशात विविध देशातील प्रवासी येत असतात. त्यांना इथे प्रवास करताना अनेक गोष्टींची माहिती हवी असते. जसे की, पर्यटन स्थळांची माहिती, राहण्यासाठी सुयोग्य हॉटेल्स, जेवणासाठी उत्तम ठिकाणे, इत्यादि. ही माहिती आपण ट्रॅवल ब्लॉग मध्ये देऊ शकतो. तुम्ही ब्लॉग मराठी मध्ये लिहिला तरीही translator च्या मदतीने लोकं तुमचा ब्लॉग वाचू शकतात. याचा एक सगळ्यात मोठा फायदा असेल की तुम्हाला मोठ्या प्रमाणात sponsorship साठी request येऊ शकतात, ज्याद्वारे ही तुम्ही पैसे कमवू शकता. त्यामुळे travel blog ही उत्तम विषय आहे ब्लॉगिंग करण्यासाठी.
4) Beauty:- मुलींसाठी तर हा अगदी उत्तम विषय आहे. यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या beauty product बद्दल माहिती देऊ शकता. मार्केटमध्ये नवीन कोणतं प्रॉडक्ट आलेलं आहे, Product recommendation ही देऊ शकता.सध्याच्या स्थितीत स्वतःची काळजी घेणं हे प्रत्येकालाच महत्वाचं आहे. एखादं प्रॉडक्ट घेताना त्याची पुरेपूर माहिती असेल, तर आपले पैसे वाया जात नाही. कोणासाठी कुठलं प्रॉडक्ट योग्य आहे किंवा कुठलं नाही याची माहितीही तुम्ही या ब्लॉगद्वारे देऊ शकता. तसेच Affiliate marketing ही तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्ही या विषयावर ब्लॉगिंग करू शकता.
5) Fashion blog :- मार्केट मध्ये नवनवीन fashion trend येत असतात. म्हणजे कधी कोणता ड्रेस, कुर्ता, साडी आलेली असेल, किंवा एखादी नवीन फॅशन आलेली असेल. सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं, पण त्या सोबत आपल्या शरीराला साजेल असे कपडे घालणं ही तितकंच महत्वाचं असतं. आणि या बद्दल तुम्ही fashion blog मध्ये लिहू शकता. तसेच affiliate marketing द्वारे ही तुम्ही पैसे कामवू शकता.
6) Relationship and parenting:- सध्याचा काळ हा आधुनिक काळ आहे. आत्ताच्या काळात जेवढे शारीरिक त्रासस आपल्याला सहन करावे लागतात, तेवढंच आपल्याला मानसिक ताण तणाव ही सहन करावा लागतो. सध्याच्या काळात या ताण तणावाचा परिणाम आपल्या नाते संबंधावर पडतो. अनेक लोकं यामुळे आपल्या जवळच्या व्यक्ति सोबत संबंध तोडतात. याचं कारण म्हणजे त्यांना या सर्व तणावासोबत आपले नाते कसे टिकवायचे हे माहीत नसतं. या ताण तणावाचा परिणाम हा तुमच्या मुलांवर ही होतो, ज्यामुळे तुमची मूले तुमच्यापासून दुरावू शकतात, किंवा चुकीचे पाऊल ही उचलू शकतात. अशा लोकांना तुम्ही तुमच्या ब्लॉगमार्फत मदत करू शकता. तुम्ही relationship आणि parenting या विषयवार ब्लॉग लिहून अशा लोकांना मदत करू शकता. यामुळे ना तर केवळ तुम्ही पैसे केवळ पैसे कमवाल परंतु तुम्ही अनेक लोकांच्या समस्या ही सोडवू शकता.
7) Book blog:- कोणतीही वस्तु घेण्याआधी आपण त्या वस्तूचा अनुभव इतरांकडून ऐकतो, ती वस्तु पाहतो, एवढेच नव्हे तर आपण त्याबद्दल ऑनलाइन ही बरीच माहिती बघतो. याच्यामागे एकच कारण की आपल्याला आपले पैसे योग्य त्या ठिकाणीच खर्च करायचे असतात, याशिवाय योग्य वस्तु घेणं हा ही त्यामागचा हेतु असतो. याच गोष्टी पुस्तक घेताना ही लागू पडतात. अनेक लोकांना योग्य पुस्तक निवडताना वरील गोष्टींचा विचार करतात, जेणेकरून त्यांचे पैसे वाचतील, व योग्य ते पुस्तक ते वाचू शकतील. अशा लोकांना तुम्ही book blog द्वारे मदत करू शकता. यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडणारं कोणतेही पुस्तक वाचून त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही लिहू शकता. त्यामुळे ज्याला तुमचा रिव्यू आवडेल तो ते पुस्तक वाचण्यासाठी घेईल. यासाठी तुम्ही affiliate link ही वापरू शकता, त्याद्वारे ही तुम्ही पैसे कमवू शकता.
8) Eco friendly life:- तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की आत्ताच्या काळात आपण जितकी प्रगती करत आहोत तेवढेच प्रकृतीचे नुकसान ही करत आहोत. आपण ज्या जुन्या काळाबद्दल बोलतो तो काळ हाच की जिथे प्रकृतीचे नुकसान न होता आपण आपले आयुष्य जगत होतो. यामुळे उत्तम आयुष्यासाठी प्रकृतीची काळजी ही अत्यंत गरजेची आहे. आणि अशा प्रकारच्या आयुष्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. अशा लोकांसाठी तुम्ही Eco friendly life व best from waste अशा पद्धतीचे आर्टिकल लिहून ना केवळ तुम्ही पैसे कमवाल तर या सोबतच तुम्ही प्रकृतीची काळजी घेण्यासाठी योगदान ही द्याल. यामध्ये AdSense सोबतच affiliate marketing, paid promotion करून ही पैसे कमवू शकता.
9) Home decor:- प्रत्येकासाठी आपलं घर म्हणजे कम्फर्ट प्लेस असते, अशी जागा जिथे आपण आपल्या कामाचा ताण विसरून खुश राहू शकतो. जर आपलं घर व्यवस्थित नसेल तर आपल्याला ही व्यवस्थित वाटत नाही. प्रत्येकालाच आपलं घर छान आणि व्यवस्थित सजवलेलं आवडतं. अशा लोकांसाठी तुम्ही Home decor बद्दल ब्लॉग लिहू शकता ज्यात तुम्ही घर कसे सजवावे? घरासाठी कोणत्या वस्तु घ्याव्यात? eco friendly home decor, इत्यादि गोष्टींबाबत ब्लॉग लिहू शकता. यात AdSense, affiliate marketing, इत्यादि द्वारे पैसे कमवू शकता.
10) Personal finance:- पैसा तर प्रत्येक जण कमवतोच, पण महिन्याच्या शेवटी निकड असल्यावर तेच पैसे तुमच्याकडे नसतात. याचं कारण म्हणजे तुम्हाला पैशांच व्यवस्थापन कसं करायचं हे माहीत नसणं होय. अशा लोकांसाठी तुम्ही Personal finance या विषयावर ब्लॉग लिहू शकता ज्यामध्ये तुम्ही विविध गुंतवणुकीचे मार्ग, पैसे कसे वापरावे? पैशांचे योग्य नियोजन कसे करावे? पैसे कसे साठवावे? इत्यादि गोष्टी बाबत ब्लॉग लिहून ही पैसे कमवू शकता. AdSense, affiliate marketing, paid post द्वारे पैसे कमवू शकता.
Summary:-
मी या ज्या 10 niches सांगितल्या आहे त्या खास नवीन लोकांसाठी आहे ज्यांना ब्लॉगिंग साठी विषय निवडण्यात अडचणी येत आहेत. सुरुवातीला तुम्ही या वर काम करू शकता, तुम्हाला niche बदलायची असेल तरी बदलू शकता किंवा यामध्येही काम करू शकता. प्रत्येक niche मध्ये विविध प्रकारे पैसे कमावण्याचे प्रकार ही मी सांगितले आहेत ज्याचा तुम्हाला फायदा होईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचा Lifestyle blog सुरू करू शकता. आशा आहे की तुम्हाला आमचा आर्टिकल आवडला असेल.
धन्यवाद.