What is SEO? Beginners guide to understand SEO

 Beginners guide to understand SEO

आत्ताच्या ऑनलाइन जगत स्वतःची जागा निर्माण करणे महत्वाचे आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी, किंवा ब्लॉगद्वारे कमाई होण्यासाठी आपली वेबसाइट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे. पण त्या साठी फक्त वेबसाइट आणि त्यावर कंटेंट असणं महत्वाचं नाहीये, तर तुमची वेबसाइट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला एका साधनाचा वापर करणे महत्वाचे आहे. कारण याद्वारे तुमच्या वेबसाइट वर ट्रॅफिक तर येईलच, पण तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी ही मदत होईल. आणि हे साधन दुसरे कोणतेच नसून SEO म्हणजेच Search Engine optimization आहे. ही एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या वेबसाइटला गूगल मध्ये रॅंक व्हायला आणि तुमच्या वेबसाइट वर जास्तीत जास्त ट्रॅफिक यायला मदत करते. तर चला आपण या SEO बद्दल आणखीन गोष्टी जाणून घेऊयात. 

What is SEO?  Beginners guide to understand SEO

What is SEO? 

SEO चा पूर्ण अर्थ म्हणजेच Search Engine Optimization. इंटरनेट वर भरपूर Search Engine आहेत. जसे की गूगल, याहू, बिंग, इत्यादि. समजा तुम्ही एखादी गोष्ट गूगल वर शोधत असाल, आणि त्यानंतर तुम्हाला विविध वेबसाइट दिसतील. काही वेबसाइट या त्या गोष्टी बद्दल असतील, किंवा काही त्यासंबधित असतील. SEO मध्ये तुम्हाला तुमची वेबसाइट ही Optimized करावी लागते, जेणेकरून तुमच्या वेबसाइटच्या संबंधित कोणी काही शोधत असेल तर त्यांना तुमची वेबसाइट दिसेल. वेबसाइट optimized करण्याचे पूढील मार्ग आहेत. 

Make SEO optimized website in just 5 steps:- 

1) Keyword research:- 

समजा तुम्ही Digital marketing  बद्दल काही शोधत आहात, आणि तुमच्या पुढे 10 अशा वेबसाइट आल्या ज्यात या शब्दाचा उल्लेख आहे. काही वेबसाइट या फक्त Digital marketing  बद्दल असतील, तर काही त्या संबंधित. तर या 10 वेबसाइट ने एकच समान शब्द वापरला आहे तो म्हणजे Digital marketing. यालाच आपण keyword असे म्हणतो. तुमची वेबसाइट ही फक्त  एकाच keyword वर रॅंक होत नाही. तुम्हाला तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाइट संबंधित वेगवगेळे keyword शोधून आर्टिकल मध्ये ते add करावे लागतील. 

सुरुवातीला keyword शोधणे अवघड जाऊ शकतं, पण एकदा का तुम्हाला keyword reasearch  करणं जमलं की पुढे तुम्हाला अडचण येणार नाही. यामुळे गूगल ला तुमची वेबसाइट कोणाला दाखवायची हे कळण्यासाठी मदत होते. आणि मग तुमच्या वेबसाइट वर ट्रॅफिक यायला मदत होते. 

2) Quality content:- 

गूगल किंवा बिंग वर तुमचा ब्लॉग तेव्हाच रॅंक होईल, किंवा ट्रॅफिक येईल जेव्हा तुम्ही तुमचे आर्टिकल उत्तम असतील. कोणताही व्यवसाय वेबसाइट वर वाढवायचा असेल, तर त्यासाठी ब्लॉग लिहिणे आवश्यक असते. तुमचा ब्लॉग किमान 1000 ते 1500 शब्दाचा असावा, त्यामध्ये research केलेली असावी. आर्टिकल हा मुद्देसूद असावा. केवळ 1000 शब्दाचा आहे, म्हणून त्यात अनावश्यक गोष्टी लिहू नये. त्या आर्टिकल मध्ये सखोल महिती असावी, जेणेकरून वाचकांना त्यातून मदत होईल. तेव्हाच तुमची वेबसाइट रॅंक होऊ शकते. 

3) User friendly website design:-

तुमचा आर्टिकल जेवढा वाचकांना वाचायला सोप्पाअसावा, तेवढंच वाचकांना तुमच्या वेबसाइट वर जास्त काही अडचणी येणार नाही याची काळजी घ्यावी. तुमच्या वेबसाइट वर पूढील पेजेस असावेत.  
1) Home page. 
2) About us. 
3) Contact us. 
4) Privacy and policies. 
4) Terms and conditions. 
तसेच वेबसाइट वर Categories हा पर्याय असावा. तुमचा आर्टिकल ज्या  Category मध्ये आहे, त्यात तो आर्टिकल add करावा. उदाहरणाने समजूया:- तुमचा एक आर्टिकल आहे Social media managment या विषयावर, आणि तुमच्या कडे 4  Categories आहेत, जसे की Motivational blogs, self help blogs, digital marketing, recipes. तर हा आर्टिकल digital marketing या Category येणार. तर त्यात तुम्ही तुमच्या थीम नुसार सेटिंग करून आर्टिकल add करू शकता. यामुळे तुमच्या वाचकांना ब्लॉग शोधायला मदत होईल. तसेच Search the blog हा पर्याय ही तुम्ही add करू शकता. यामुळे ही वाचकांना ब्लॉग शोधायला मदत होईल.

What is SEO?  Beginners guide to understand SEO

4) Backlinking:- 

यामध्ये तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये तुमच्या आर्टिकलच्या links टाकू शकता. यासाठी तुम्हाला नक्कीच मेहनत घ्यावी  लागेल. उदाहरणार्थ:- तुम्ही WordPress या विषयावर आर्टिकल लिहीत आहात, आणि तुम्ही 'होस्टिंग म्हणजे काय?' यावर एक आर्टिकल ही लिहिला आहे. तर WordPress वाल्या  आर्टिकल मध्ये तुम्ही   ''होस्टिंग म्हणजे काय?'' या आर्टिकलची लिंक टाकू शकता. जेणेकरून वाचक या एका आर्टिकल सोबतच आणखीन आर्टिकलवर सुद्धा जातील. किंवा तुम्ही त्या पोस्ट मध्ये ही तुमच्या एखाद्या आर्टिकलची लिंक टाकू शकता. यालाच internal linking म्हणतात. 

याव्यतिरिक्त तुमच्या निश सारखीच किंवा त्या संबंधित आणखीन एखादी वेबसाइट असेल ज्यावर ट्रॅफिक ही खूप असेल,  त्यांच्या ओनरला तुम्ही त्यांच्या ब्लॉगमध्ये तुमच्या आर्टिकची लिंक टाकण्यासाठी ही request करू शकता. त्याबदल्यात तुम्ही त्यांना पैसे ही देऊ शकता. यालाच external linking असे म्हणतात. याद्वारे ही तुम्ही तुमच्या वेबसाइटवर ट्रॅफिक आणू शकता. 

5) Optimize images:- 

तुम्ही चांगला आर्टिकल लिहिला आहे, क्वालिटी ही चांगली आहे, keyword ही तुम्ही आर्टिकल मध्ये टाकले आहेत. पण यात एक कमी आहे, ती म्हणजे फोटोची. तुम्ही जो कोणता आर्टिकल लिहीत असाल, त्यासंबंधित फोटो हा तुमच्या ब्लॉग मध्ये असायला हवं. जेणेकरून कोणी वरवर जरी तुमच्या वेबसाइट वर आलं तरी फोटो बघून तो तुमचा आर्टिकल ही वाचू शकतो. याद्वारे तुमचं Seo तुम्ही करू शकता. 

SEO हा कोणता app नाहीये, किंवा software नाहीये. फक्त या काही गोष्टी तुम्हाला त्यात कराव्या लागतात, जेणेकरून search engine जसे की गूगल, याहू, यांना तुमचा ब्लॉग योग्य त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होते. नवीन ब्लॉगरला ही पद्धत किचकट वाटू शकते, परंतु ही पद्धत अगदी सोप्पी आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्ही तुमच्या वेबसाइट वर ट्रॅफिक आणू शकता. SEO बद्दल तर आपण जाणून घेतलं. आता जाणून घेऊयात की याचे फायदे काय आहेत ते. 

What is Seo?- Seo म्हणजे काय?  

आत्ताच्या  ऑनलाइन जगात आपल्या वेबसाइट वर जितके जास्त लोक भेट देतील, तेवढंच तुमच्या व्यासायसाठी चांगलं आहे. वेबसाइटवरुन तुम्ही कोणत्याही प्रकारे पैसे कमवा, मग ते Google AdSense, affiliate marketing, असो किंवा तुमचं Product sell किंवा course sell करणे असो. जितके लोकं येतील तेवढीच तुमची कमाई जास्त होईल. 

SEO ला आपण Search Engine optimization असेही म्हणतो. हे कोणतंही app नसून एक process आहे, ज्याचा फायदा तुमच्या website वर जास्तीत जास्त visitor आणण्यासाठी होतो. SEO कसं करायचं हे आपण मागच्या आर्टिकल मध्ये पाहिलं आहे. आता या article मध्ये आपण Seo चे फायदे पाहुयात. 

Top 5 benefits of SEO - Seo चे 5 मुख्य फायदे

Top 5 benefits of SEO

1) Helps website to rank on google:- प्रत्येक website owner चं website बनवण्याचे उद्दिष्ट हे website google वर rank करणे हे असते. कारण यामुळे तुमची website जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. तुम्ही Google AdSense वापरत असाल तर तुमची कमाई चांगली व्हायला ही मदत होते. जास्तीत जास्त clicks ही येतात. Seo चा हा पहिला मुख्य फायदा आहे. 

2) Boost organic traffic:- website चं खरं यश  हे जास्तीत जास्त organic traffic येण्यातच असतं. याचाच अर्थ तुम्ही तुमच्या website वर चांगल्या प्रकारे SEO करत आहात. Website वर जास्तीत जास्त traffic येण्यासाठी बहुतांश लोक हे समाज माध्यमांचा वापर करतात. पण काही वेळा जर जास्त ट्रॅफिक हे समाज माध्यमांद्वारे येत असेल तर ad limit लागण्याची शक्यता असते. तुम्ही जर चांगल्या प्रकारे SEO करत असाल तर तुमच्या वेबसाईटवर जास्तीत जास्त organic traffic यायला मदत होते. आणि एक गोष्ट अशी की तुम्हाला तुमची वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणत्याही समाज माध्यमांचा किंवा paid promotion चा वापर करण्याची गरज पडत नाही. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा वाचतो. SEO करण्याचा हा एक फायदा आहे की तुम्ही तुमच्या वेबसाईट वरती जास्तीत जास्त organic traffic आणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता.

3)  Getting potential leads:-  बरेच लोक website स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी बनवतात. अशा व्यवसायांसाठी SEO म्हणजे वरदानच म्हणायला हवे. SEO द्वारे तुमची वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत तर पोहोचतेच, परंतु SEO करताना आपण नेहमी असेच keyword वापरतो की की ज्याबद्दल किंवा त्या संबंधित जास्तीत जास्त searches होत आहेत. यामुळे पण फक्त त्याच लोकांपर्यंत नाही पोहोचत की जे याबद्दल शोधत आहेत, परंतु आपण त्या लोकांपर्यंतही पोहोचतो जे त्या विषयाबद्दल शोधत आहेत. समजा तुमचं एखादं product तुम्हाला विकायचं असेल, तर तुम्ही ते targeted keyword नक्कीच वापरणार, कारण हा SEO चाच एक भाग आहे. तर जो कोणी तुमच्या प्रॉडक्ट बद्दल किंवा त्या संबंधित काही शोधत असेल तर तुमची वेबसाईट नक्कीच त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. यामुळे तुमचं प्रॉडक्ट विकण्यासही मदत होते, मग ते प्रॉडक्ट कोणतेही असो. SEO मुळे तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी जास्तीत जास्त potential leads generate करू शकता जेणेकरून तुमचा व्यवसाय वाढायला मदत होईल.

4) Free marketing:-  बरेच लोक आपली वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रकारच्या ads लावतात. काही वेळेला तुमच्या वेबसाईटवर ट्रॅफिक येतही, परंतु काही वेळा ते न येण्याची शक्यताही असते. SEO म्हणजे free marketing करण्याचं एक साधनच आहे. Keyword research करायला, SEO optimized article लिहायला, competitor analysis करायला कोणत्याही प्रकारच्या खर्चाची गरज लागत नाही. आणि मुख्य म्हणजे SEO करणेही अगदीच free आहे. तसेच SEO द्वारे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहात त्यामुळे तुम्हाला तुमच्या वेबसाईटची free marketing करण्यासाठी SEO चा फायदा होतो.

5) Long term benefits:- SEO चा फायदा जसा लहान मोठे व्यवसायासाठी होतो तसेच ब्लॉगर्स ला सुद्धा होतो. SEO करायला किंवा Website rank व्हायला वेळ लागू शकतो कारण google प्रत्येकच वेबसाईट rank करत नाही. कारण google चा तुमच्या वेबसाईट वरती, वेबसाईटवर तुम्ही आर्टिकल किती सातत्याने टाकत आहात यावर विश्वास बसायला वेळ लागतो. SEO म्हणजे अगदी क्षणात होणारी गोष्ट नाहीये, जसे की आपण या आधीही जाणून घेतलं की ही एक प्रोसेस आहे आणि ती व्हायला वेळही लागतो. त्यामुळे जर तुमची वेबसाईट नवीन असेल तर तुम्हाला SEO नियमितपणे करावे लागेल. सुरुवातीला जरी वेबसाईटवर ट्रॅफिक यायला वेळ लागला, किंवा तुमची वेबसाईट रँक होत नसेल तरी याचा फायदा तुम्हाला पुढील काळात होऊ शकतो. कारण तुम्ही जे आर्टिकल आता लिहीत आहात त्यावर जरी आत्ता सर्च नसतील, तरी येणाऱ्या काही काळात सर्च वाढूही शकतात. जर तुम्ही असा विचार करत असाल की SEO द्वारे लगेच तुमची वेबसाईट ट्रेन होईल तर हा तुमचा गैरसमज आहे. जर तुम्ही SEO वर सातत्याने काम केले, नियमित आर्टिकल पोस्ट केले, तुमच्या वेबसाईटची Quality improve करण्यासाठी प्रयत्न केले तर तुमच्या वेबसाईटवर पुढील काळात जास्तीत जास्त ट्रॅफिक केलं मदत होईल. मग भले तुमचा आर्टिकल आज रँक होत नसेल पण पुढील काळात तुम्ही आर्टिकल नाही लिहिला तरी तुमच्या आधीच्या आर्टिकल वरती ट्राफिक हे येतच राहणार. काही ब्लॉगर्स असेही असतात की ज्यांना वेबसाईट वरती काम न करता पैसे कमवायचे असतात, तर अशांनी सुरुवातीला जास्तीत जास्त SEO वर लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच तुम्ही काम न करता हे पैसे कमवू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या की या सगळ्यासाठी निश्चित वेळ आपण सांगू शकत नाही त्यामुळे तुमच्या कामांमध्ये सातत्य हे असायला हवे. याद्वारे तुम्हाला long terms मध्ये फायदे मिळणार आहेत. कारण चांगल्या गोष्टी घडून यायला वेळ लागतो.

Summary of the article:- 

आत्ताच आपण या ब्लॉगमध्ये SEO चे जे 5 फायदे आहेत ते पुढीप्रमाणे:-

1) Helps website to rank on Google.
2) Boost organic traffic.
3) Getting potential leads.
4) Free marketing.
5) Long term benefits.

एक बोनस म्हणून आपण जाणून घेऊ की गूगल वरुन keyword research करायचं ते हे फ्री मध्ये.  

How do you search keywords for free? 

Keyword research हे website successful बनवण्यासाठी अत्यंत महत्वाचे असते. हा SEO चा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. SEO करताना Keyword research करण्याला तुम्हाला प्रथम प्राधान्य द्यावेच लागतं. तुम्ही बऱ्याच website अशा पाहत असालच की, ज्याच्यावर लाखोने traffic येतंय. अशा websites मध्ये लिहिलेल्या blogs मध्ये Seo करण्यासोबतच keyword research वरही लक्ष दिलं जातं. Blog grow करणे म्हणजे फक्त article टाकत जाणं नसतं. तर त्या article मध्ये तुम्हाला keyword research करणे ही महत्त्वाचे असते. तुम्हालाही तुमच्या website वर लाखो ने traffic हवा असेल तर आर्टिकल नक्की वाचा.

तुमच्या website ची niche कोणतीही असो, भाषा किंवा platform कुठलाही असो. सुरुवातीला तुम्ही कमाई कराल याचे शाश्वती नसते. Affiliate blog असला तरीही traffic महत्त्वाचं असतंच. Blogging च्या सुरुवातीला जिथे तुमची कमाई अजिबातच नसेल, अशात keyword research साठी paid tool वापरणे अयोग्य आहे. जोवर कमाई होत नाही तोवर free tools ही तुम्ही वापरू शकता. Paid tool मध्ये खर्च करावाच असं बंधन नसतं. कारण Internet वर तुम्ही एकही रुपया खर्च न करता Free keyword research करू शकता. आणि आजच्या आर्टिकल मध्ये आपण Free keyword research कसं करायचं ते पाहू.ते करण्यासाठी तुम्हाला पुढील steps follow कराव्या लागतील.

How to search keyword for free? - Free मध्ये keyword research कसं करायचं?

Steps for free keyword research:- 

1)  तुम्हाला ज्या विषयावर blog लिहायचा आहे, तो विषय google वर search करा. आणि पहा की त्या विषयावर किती blogs लिहिले आहेत. आणि ते blogs वाचा. त्याचं title copy करा. 

2)  त्या blog मधले तुम्हाला महत्त्वाचे वाटणारे keywords copy करा किंवा लिहून घ्या.

3) त्यानंतर एकदा google वर तुम्ही सगळ्यात आधीच जो topic शोधला, तो पुन्हा शोधा आणि आता तुम्हाला खाली खाली scroll करून "People also ask" असे एक section दिसेल. त्यातल्या तुम्हाला महत्त्वाचे वाटणारे आणि तुमच्या topic सोबत संबंधित असणारे प्रश्न copy करा किंवा लिहून घ्या.

4)  आता google वर जाऊन Ahrefs free keyword research tool असं शोधा. हे एक keyword research करण्यासाठीच free tool आहे. आता यात तुम्ही निवडलेले
 keyword हे "Search the keyword" मध्ये paste करा, तुम्ही ज्या country ला target करत आहात ती निवडा. जर "I am not robot" असं येत असेल तर त्यावर click करा, आता search वर click करा. 

5) तुमच्यासमोर भरपूर keywords येतील. त्यातले तुम्हाला असे keywords निवडायचे आहेत ज्याची keyword difficulty 1 ते 30 असेल, search volume किमान 200 ते 500 च्यावर असावा. अशा प्रकारे तुम्ही एकही रुपया खर्च न करता free मध्ये keyword रिसर्च करू शकता. 

Conclusion:-

अशा प्रकारे तुम्ही free मध्ये अगदी एकही रुपया खर्च न करता keyword research करू शकता. असं नाही की योग्य ते keyword वापरल्यावर लगेचच लाखोने तुमचा website वर ट्रॅफिक येईल. Google च्या algorithm ला तुमच्या वेबसाईट बद्दल कळायला वेळ लागतो, कारण ती website नक्की कोणापर्यंत पोहोचवायची हे त्यामुळे गुगलला कळतं. त्यामुळेच तुम्ही keyword research मध्ये सातत्याने काम करा. तर तुम्हाला उत्तम रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. आशा आहे की तुम्हाला आमचा आर्टिकल आवडला असेल. धन्यवाद.

Conclusion:- 

SEO करणे हे जास्त कठीणही नाही आणि जास्त सोपंही नाहीये. परंतु जर तुम्ही तुमच्या कामात सातत्य ठेवलं तर याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. जर तुमचाही तुमच्या वेबसाईट वरती व्यवसाय असेल, किंवा तुम्हीही एक ब्लॉगर असाल तर तुम्हाला तुमच्या वेबसाईट वरती SEO ला करण्या अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही केवळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तर फक्त पोहोचणार नाही आहात, परंतु याद्वारे तुमचे प्रॉडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, तुम्ही जर Google AdSense वापरत असाल तर तुमच्या वेबसाईट वरती जास्तीत जास्त क्लिक येऊन ची कमाई वाढू शकते. असे आहेत हे SEO चे मुख्य पाच फायदे. पूढील ब्लॉगमध्ये आपण seo चे काही प्रकार आणि Free SEO keyword research tools ची माहिती घेऊयात. 



थोडे नवीन जरा जुने