What is SEO? Different types of SEO in Marathi
जेव्हा केव्हा वेबसाइट रॅंक करण्याचा विचार आपल्या मनात येतो, तेव्हा एक गोष्ट ही आपल्या डोक्यात कायम येते ती की अशी कोणती पद्धत आहे की आपली वेबसाइट रॅंक होईल? Website rank करणं हे सोप्पं ही नाही, आणि अवघड ही नाही. फक्त त्यासाठी वेळ लागू शकतो. एकूणच त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावीच लागते. अशी एक पद्धत आहे ज्यामुळे तुमची वेबसाइट रॅंक व्हायला मदत होते, आणि ती म्हणजे SEO ( Search engine optimization). SEO म्हणजे काय आणि त्याचे कोणकोणते प्रकार आहेत हे आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.
SEO (Search engine optimization) in Marathi
आपण आपल्या एका ब्लॉग मध्ये SEO म्हणजे काय ( What is SEO) हे पाहिलं आहेच. तरीही थोडक्यात जाणून घ्यायचं राहिलं, तर SEO हा कोणताही Software किंवा app नसून ही एक प्रक्रिया आहे ज्यामुळे तुमची वेबसाईट rank व्हायला किंवा traffic यायला मदत होते. या ब्लॉगमध्ये आपण SEO चे वेगवेगळे प्रकार पाहुयात, जेणेकरून SEO बद्दलची आणखीन माहिती मिळायला मदत होईल.
SEO चे मुख्य तीन प्रकार आहेत, ते म्हणजे:-
1) On page SEO
2) Off page SEO
3) Local SEO
4) Technical SEO
आपण या SEO च्या मुख्य प्रकरांबाबत थोडक्यात जाणून घेऊ, आणि पूढील काही दिवसात या प्रत्येकाबद्दल सखोल माहिती जाणून घेऊयात.
Different types of SEO in Marathi:-
1) On page SEO:- यामध्ये तुम्हाला मुख्यतः तुमच्या ब्लॉग पोस्ट वर लक्ष द्यायचे असते. हा SEO चा प्रकार तुमच्या आर्टिकल संबंधित आहे. यामध्ये तुम्हाला पूढील गोष्टी कराव्या लागतात.
2) Off page SEO:- On page SEO मध्ये तुम्हाला blog post च्या SEO कडे लक्ष द्यावं लागतं, तर Off page SEO मध्ये post केल्यानंतरच्या SEO कडे लक्ष द्यावं लागतं. यामध्ये तुम्हाला पूढील गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं.
अ ) External backlinking:- Internal linking मध्ये आपण आपल्या आर्टिकल मध्ये आपल्याच एखाद्या ब्लॉग पोस्टची लिंक जी आहे ती add करतो की, जी त्या आर्टिकल संबंधितच ब्लॉक पोस्ट असेल. External linking ला आपण External backlinking असेही म्हणतो. या मध्ये आपण एखादी website आहे की ज्याच्यावरती traffic खूप जास्त आहे, तर त्या website च्या owner म्हणजेच मालकाला आपण request करू शकतो की तुमच्या ब्लॉग पोस्टमध्ये आमच्या या या ब्लॉग पोस्टची link ॲड करा यालाच backlinking असे म्हणतात. यामुळे काय होतं की आपल्या website वरती traffic यायला मदत होते. आणि तुम्हाला जर backlinking बनवायचे असेल तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल की तुम्ही ज्या owner ला तुमच्या ब्लॉग पोस्टची लिंक देत आहात ती तुमच्या niche संबंधितच असेल. म्हणजे समजा की आपली एखादी ब्लॉग पोस्ट SEO related आहे आणि समोरच्याची website digital marketing related आहे, तर हे जे दोन्ही विषय आहेत ते एकमेकांशी सहसंबंधित आहेत. तर अशा वेळेला तुम्ही backlinking करू शकता. backlinking करण्याचा एक फायदा होतो की तुमच्या वेबसाईटवर Traffic यायला मदत होते. Off page Seo मध्ये backlinking हा एवढाच एक पर्याय नसून, इतरही काही पर्याय आहे ज्या द्वारे तुम्ही तुमचे ट्रॅफिक जे आहे ते वाढवू शकता.
ब ) Social media marketing :- यासाठी तुम्हाला तुमची जी वेबसाईट आहे त्यासंबंधित एखादे Instagram, factbook, Quora वरती तुम्हाला तुमचे page बनवावे लागेल. त्याच्यावरती तुम्ही एक छोटासा article लिहू शकता, आणि त्यामध्ये तुमच्या या website चे link आहे ती टाकू शकता. कारण या सगळ्या Social media वरती जे traffic आहे ते खूप जास्त येतं. आणि जे कोणी तुमच्या विषयासंबंधीत काही शोधत असेल इंटरनेट वरती तर त्यांच्यापर्यंत तुमचा Account आहे ते सहजरीत्या पोहोचेल, आणि त्यामुळे तुमच्या वेबसाईट वरती traffic यायला मदत होईल. तर अशा प्रकारे तुम्ही Social media marketing द्वारेही तुमच्या वेबसाईटवर आणू शकता.
क ) Guest posting:- मगाशी आपण जे उदाहरण घेतलं तेच आता आपण घेऊयात की एखाद्याची website ही digital marketing आहे तर तुम्ही त्यांना request करू शकता की आम्हालातुमच्या website वर गेस्ट पोस्ट लिहायची. म्हणजे तुमच्या वेबसाईट वरती आम्ही एक पोस्ट करू इच्छितो जी की Seo बद्दल असेल. त्याच्यामध्ये तुम्ही Seo बद्दल Basic माहिती लिहू त्याच्यामध्ये देऊ शकता आणि तुम्ही त्याच्या शेवटी किंवा मध्ये तुमच्या वेबसाईट ची लिंक त्यामध्ये देऊ शकता. ही गेस्ट पोस्टिंग free असू शकते किंवा paid असू शकते. कारण या द्वारेही तुमच्या वेबसाईट वरती traffic यायला मदत होते. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वेबसाईट वरती ट्रॅफिक आणू शकत गॅस पोस्टिंग द्वारे.
या मुख्य दोन पद्धतीने तुम्ही Off page Seo करून तुमच्या वेबसाईट वरती ट्रॅफिक आणू शकता. करण Off page Seo मध्ये तुमचं जे काही काम असेल ते तुमच्या ब्लॉग पोस्ट केल्यानंतरच काम असतं. म्हणजे तुम्ही एकदा आर्टिकल पोस्ट केला त्याच्यानंतर जे काही काम असेल जसे की :- कोणाला लिंक शेअर करणं झालं, सोशल मीडियावरती पोस्ट करणे झालं,Back linking build करणं झालं किंवा Guest posting लिहिणं झालं हे तुम्हाला Off page Seo मध्ये करावं लागतं.
4 ) Technical Seo:- Technical Seo हा आपल्या वेबसाईटच्या सगळ्या technical गोष्टी संबंधित आहे. ज्यामुळे तुमच्या ब्लॉग वरती जे कोणी वाचक येतील त्यांना काही अडचणी येणार नाही. Technical Seo मध्ये तुम्हाला पुढील गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल.
अ) Broken links :- म्हणजे तुम्ही तुमच्या वेबसाईट वरती एखादी जर link add करत असाल मग ती affiliate link असो, किंवा तुमचे Internal link असो, किंवा External link असो ती व्यवस्थित काम करते का नाही याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागत.
ब) Website speed :- म्हणजे तुमची वेबसाईट ही व्यवस्थित चालू होती की नाही? एखाद्या वापरकर्त्यांनी एखाद्या वाचकांनी जर तुमची वेबसाईट ओपन केली तर ती लवकरात लवकर चालू होती का नाही? जर तुमच्या वेबसाईट वरती ऍड असतील तर त्याचा तुमच्या वेबसाईट वरती काही लोड येत नाहीये ना? याकडे तुम्हाला मुख्यतः लक्ष द्यावे लागत.
क) Domain, hosting, SSL certificate:- जर तुमची वेबसाईट ही फ्री Blogspot वरती बनवलेली आहे आणि तुम्ही त्याला custom domain add केलेला आहे, तर ते व्यवस्थित काम करत आहे का नाही याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागते. कारण यामध्ये तुम्हाला कोणताही प्रकारचे Hosting घ्यावी लागत नाही किंवा SSL certificate याच्यामध्ये add करावे लागत नाही. जर तुमची वेबसाईट ही WordPress वरती असेल तर तुम्हाला या तिन्ही गोष्टी विकत घ्याव्या लागतात. पण या जर व्यवस्थित काम करत असतील तरच तुमची जी Website speed व्यवस्थित चालेल तसेच, वाचकांना काही त्रास होणार नाही. त्यामुळे Technical Seo मध्ये या गोष्टीकडे खास करून लक्ष द्यावे लागत.
या काही technical गोष्टी आहेत अगदी छोट्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्याचा परिणाम तुमच्या वेबसाईट वरती होऊ शकतो, तुमच्या कमाई वरती होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला Technical Seo कडेही खूप जास्त लक्ष द्यावे लागत.
4) Local SEO:-
यामध्ये तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कोणत्या गोष्टीवर जास्तीत जास्त search केले जातात याकडे लक्ष द्यावे लागते. यासाठी तुम्ही वेगवेगळे Tools वापरू शकता. जसे की SEMrush , Uber suggest इत्यादी. Local SEO याचा मुख्य फायदा हा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त ग्राहक तुमच्या वेबसाईटवर Attract करायला मदत होते. जर तुमचा व्यवसाय असेल आणि तो तुम्ही वेबसाईटद्वारे चालवण्याचा प्रयत्न करत असाल तर यासाठी तुम्हाला Local SEO चा खूप जास्त फायदा होतो. ज्या गोष्टी तुम्हाला On page, off page आणि Technical Seo मध्ये करकराव्या लागतात त्याच गोष्टी तुम्हाला Local SEO कराव्या लागतात.
हे आहेत SEO चे काही मुख्य चार प्रकार. SEO हा एकच प्रकारचा नसून हा वेगवेगळ्या गोष्टी संबंधित आहे, ज्याचा परिणाम तुमच्या वेबसाईट वरती होऊ शकतो. करण वेबसाईटचा मुख्य उद्देश हा जास्तीत जास्त traffic आणून त्याद्वारे कमाई करण्याचा असतो. त्यामुळेच तुम्हाला फक्त तुमचा ब्लॉग आर्टिकल ची क्वालिटी, वेबसाईट कशी बनवली याकडेच लक्ष देऊन चालत नाही. तर, वेबसाईट वरती traffic आणण्यासाठी Seo यकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे लागत. हे झालं SEO बद्दल. आता आपण जाणून घेऊयात की seo साठी कोणते free keyword research tools उपलब्ध आहेत ते.
Free keyword research tools for beginner
एक नवीन ब्लॉगर असाल, तर माझा हा सल्ला आहे की कोणतंही paid tool वापरू नका. कारण बाजारात बरेच free tools आहेत, त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला keyword research साठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. यातले काही tools हे paid असले तरीही कमीतकमी free search मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त keywords मिळतील. तर हा आर्टिकल नक्की शेवटपर्यंत वाचा.