Essential things before starting a blog:-
आपल्या मध्ये कितीतरी जण ब्लॉगिंग सुरू करायचं ठरवलं की लगेचच Domain hosting घ्यायचा विचार करतात, आणि youtube वर video बघून ब्लॉग बनवतात. मग त्यांच्या पुढे अनेक प्रश्न येतात की logo कसा design करायचा? traffic कसं आणायचे? ब्लॉग grow कसा करायचा? असे कितीतरी प्रश्न आणि समस्या तुम्हाला सतावतात. आणि हे अगदी माझ्यासोबत ही झालं आहे. त्यामुळे ब्लॉग सुरू करण्याआधी या गोष्टी नक्की करा, जेणेकरून तुम्हाला ब्लॉगिंग करताना समस्या उद्भवणार नाही.
5 Essential things before starting a blog:-
1) Niche selection:- तुम्ही ब्लॉगिंग करायचं ठरवलं तर आहेच, पण मग तुम्ही ब्लॉग कोणत्या विषयावर सुरू करणार आहात हे जोवर नक्की ठरत नाही तोवर तुम्ही website बनवू नका. कारण तुम्ही जे डोमेन घ्याल ते तुमच्या विषयासंबंधीतच असावं, आणि असं नसल्यास तुमच्या website च्या Seo वर परिणाम होऊ शकतो. आता जर तुम्हाला तुमच्या ब्लॉगचा विषय निवडल्यास अडचणी येत असतील, तर तुम्ही एक गोष्ट करू शकता. ती म्हणजे तुम्हाला कुठल्या विषयात रस आहे त्या विषयावर आर्टिकल लिहायला सुरुवात करा, त्या प्रकारच्या आर्टिकल लिहिण्याची practice करून घ्या. जेणेकरून तुम्हाला तुमच्या विषयाबद्दल आणखीन माहिती घेता येईल. ब्लॉगिंग च्या सुरुवातीला मुख्यतः दोन विषय निवडा. पहिला विषय मुख्य असेल आणि दुसरा उपमुख्य. या दोन्ही विषयावर तुम्ही थोडं थोडं लिहायला सुरुवात करा, आणि ज्यात तुम्ही सहजरीत्या लिहू शकत असाल तो विषय ब्लॉगिंग साठी निवडा.
2) Choosing the right blogging platform:- बरेच लोक हे सुरुवातीला त्यांची website ही WordPress वर बनवतात. की ज्याला hosting आणि domain साठी सुरुवातीला तीन ते चार हजार रुपये खर्च करावे लागतात. आणि जर तुम्हाला AdSense कडून approval मिळालं नाही तर तुमची मेहनत आणि पैसे दोन्ही वाया जाऊ शकतात. अशा वेळेला सुरुवातीला योग्य ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मची निवड करणे आवश्यक आहे. सुरुवातीला तुम्ही तुमचा ब्लॉग हा blogger वर अगदी फ्री मध्ये बनवू शकता, उत्तम result साठी तुम्ही custom domain घेऊ शकता. यामुळे तुमची ब्लॉग लिहिण्याची practice ही होईल आणि जेव्हा तुम्ही तुमचा ब्लॉग WordPress करणार तेव्हा तुम्हा ब्लॉग कसा लिहायचा, आणि काय चुका टाळायच्या त्याची कल्पना येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की सुरुवातीला तुमचा ब्लॉग तुम्ही Blogger वर बनवून नंतर तो WordPress वर न्या.
3) Learn basic graphic designing:- जेव्हा तुम्ही तुमचा ब्लॉग बनवणार आहात, तेव्हा तुमच्या वेबसाईटवर तुम्हाला logo तसेच feature images ही बनवाव्या लागतात. यासाठी तुम्हाला basic graphic designing शिकावी लागते. यासाठी तुम्ही Canva चा वापर करू शकता. ब्लॉग सुरू करण्याआधी तुम्ही logo designing ची प्रॅक्टिस करा. तुमच्या प्रत्येक आर्टिकल साठी तुम्हाला feature images ही बनवाव्या लागतात, की ज्याला आपण Thumbnail हे म्हणतो. जर thumbnail attractive असेल तर जास्तीत जास्त वाचक तुमचा आर्टिकल वाचतील. त्यामुळे तुम्हाला ब्लॉग सुरू करण्याआधीच basic graphic designing शिकणे आवश्यक आहे.
4) Learn basic SEO:- SEO ब्लॉग grow करण्यासाठी किती आवश्यक आहे हे आपण मागील काही आर्टिकल मध्ये जाणून घेतलेलं आहे. बरेच लोक आधी website बनवतात आणि मग SEO शिकायला सुरुवात करतात, आर्टिकल लिहीत असताना आपण SEO बद्दल बऱ्याच गोष्टी शिकत असतोच. परंतु काही basic गोष्टी जसे की keyword research, heading, subheading, इत्यादी गोष्टी जर तुम्ही आधीपासूनच शिकायला सुरुवात केली तर तुम्हाला एक SEO friendly article लिहायला मदत होईल. SEO एका दिवसात होत नाही याला वेळ द्यावा लागतो, पण जर तुम्ही सुरुवातीपासूनच SEO त्या छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्या आर्टिकलवर implement केल्या तर यामुळे तुमच्या वेबसाईट वरती ट्रॅफिक यायला मदत होईल. त्यामुळेच ब्लॉगिंग सुरू करण्याआधीच Basic SEO शिकणे गरजेचे आहे.
5) Backup content:- तुम्ही ब्लॉगसाठी विषय निवडला, प्लॅटफॉर्म निवडला, basic graphic designing शिकलात, Basic SEO ही शिकला. आता वेळ आहे ती आर्टिकल लिहायची. बरेच लोकं ही चूक करतात की या गोष्टी शिकल्यावर लगेचच ब्लॉगींग सुरु करतात. Blogging मध्ये सातत्य कायम ठेवायचं असेल तर तुम्हाला Backup content किंवा article लिहून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर आज तुम्ही 10 article तयार करून ठेवायचे, आणि पुढील 10 दिवसात तुम्हाला प्रत्येक दिवशी एक एक आर्टिकल पब्लिश करायचा आहे. तोवर तुम्ही ब्लॉग साठी नवीन ideas शोधू शकता. किंवा रोज एक, दोन असे आर्टिकल लिहून ठेऊ शकता. म्हणजे तुम्हाला ब्लॉगिंग शिवाय तुमचं वैयक्तिक काही काम आलं, आणि तुम्हाला आर्टिकल लिहायला जरी वेळ भेटला नाही तरी तुमच्या वेबसाईट वर आधीच पब्लिष करण्यासाठी आर्टिकल तयार असेल. माझा असा सल्ला आहे की तुम्ही किमान 15 दिवसांचा back up बनवून ठेवा.
6) Research your target audience:- ज्या वेळेला तुम्ही ब्लॉगिंग करता अर्थातच तुम्हाला आवडणारा ब्लॉगिंग विषयच तुम्ही निवडता. पण एक गोष्ट तुम्हाला पाहणे ही गरजेचे आहे की त्या विषयासाठी तुमच्याकडे वाचक वर्ग आहे ते. कारण त्यानुसारच तुम्ही तुमची ब्लॉगिंगची पूढील धोरणे ठरवू शकता. त्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता की तुम्हाला वाचकवर्ग मिळावा तुमचे वाचकवर्ग कोण असतील याचा विचार करावा लागेल. ते वाचक तुम्हाला कुठून मिळतील ते ही पहावे. यासोबतच तुमच्या वाचकांना तुमच्या ब्लॉगकडून काय अपेक्षा आहे हे जाणून घ्या. त्यासाठी तुमच्या कुठल्या आर्टिकल वर view येत आहे हे पहा, व त्यानुसार पूढील धोरणे आखा. वाचकांच्या समस्या, त्यांना वाचायला काय आवडतं काय नाही हे पहा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वाचकावर्गाबद्दल संशोधन करू शकता.
7) Plan your content:- ब्लॉगिंग करत असताना तुम्ही विषय निवडला की आणखीन एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल ते म्हणजे तुमचा content plan करावा लागेल. कारण तुम्ही कधी ही आणि कसे ही आर्टिकल लिहून ब्लॉगिंग केली तर ते दीर्घकाळासाठी चांगले नाही. यासाठी तुम्ही कोणत्या दिवशी कोणता आर्टिकल पोस्ट कराल याची योग्य योजना बनवा. जे कुठले आर्टिकलचे विषय सध्या trending मध्ये आहे ते पहा, याशिवाय तुम्हाला जे जे विषय सुचतील त्याची एक यादी बनवा. मग आठवड्याला, महिन्याला कधी व किती आर्टिकल पोस्ट करायचे आहेत हे तुम्हाला कळेल. त्यामुळे योग्य content planning करणे अत्यंत गरजेचे आहे.
8) Select the right domain name and hosting platform:- ब्लॉगिंग सुरू करण्याआधी ही गोष्ट ही अत्यंत महत्वाची आहे. ज्याप्रमाणे आपली ओळख ही आपल्या नावाने असते, त्याप्रमाणे तुमच्या ब्लॉगची ओळख ही तुमच्या नावाने असते. ब्लॉगच नाव ठरवण्यापूर्वी ब्लॉगिंगचा विषय निवडणे गरजेचे आहे. तुम्ही जो विषय निवडाल त्यावरूनच तुम्ही तुमच्या ब्लॉगचे नाव ठरवा, ब्लॉगचे नाव हे तुमच्या विषयाला अनुसरूनच असावे. ज्यावेळी तुम्ही तुमच्या ब्लॉगचे नाव ठरवाल तेव्हा योग्य domain आणि hosting platform निवडा. जर तुम्ही केवळ blogger हा प्लॅटफॉर्म वापरणार असाल तर फक्त domain name ची गरज आहे, पण ज्यावेळी तुम्ही wordpress सारखे प्लॅटफॉर्म वापराल तेव्हा hosting व domain दोन्हीची गरज असते. मी स्वतः Hostinger च domain वापरत आहे कारण मला याच्या किमती योग्य वाटतात. तुम्ही तुमच्या हिशोबाणे hosting platform ची निवड करू शकता.
9) Develop your writing routine:- ब्लॉगिंग करत असताना त्यात सातत्य असणं गरजेचं आहे. कारण एखाद्या दिवशी तुम्हाला आर्टिकल लिहायला नाही जमणार असे काही असेल, तर महिनाभर त्यामुळे गडबड व्हायला नको. यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता की ब्लॉगिंगमध्ये सातत्य राहण्यासाठी तुम्ही तुमचं writing routine काय असेल हे ठरवा. यामध्ये तुम्हाला आर्टिकलची संख्या आणि गुणवत्ता या दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल. एक आर्टिकल लिहायला जरी वेळ लागला तरी त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष तुम्हाला द्यावं लागेल. आठवड्याला व महिन्याला तुम्हाला किती आर्टिकल लिहायचे आहे, व किती post करायचे आहेत हे पहा. तुम्ही रोज किती आर्टिकल लिहिणार याचे ही एक धोरण बनवा, रोज थोडं लिहा पण रोज लिहा.
10) Prepare for monetization:- ब्लॉगिंग करत असताना कायम आपल्या डोक्यात एक विचार करावा लागतो की तुम्ही ब्लॉगद्वारे पैसे कसे कमवाल? ब्लॉगिंगमध्ये तुम्ही फक्त एकाच पद्धतीने पैसे कमवू शकत नाही तर त्याचे विविध प्रकार आहेत. जसे की Google Adsense, Affiliate marketing, paid promotion, selling e-products, अशा विविध प्रकारे तुम्ही पैसे कमवू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या ब्लॉगच्या नावाचे page social media वर चालू करून तुमच्या ब्लॉगचे promotion करू शकता. याद्वारे तुम्ही विविध मार्गाने पैसे कमवू शकता.
Summary of the article:-
ब्लॉगिंग सुरु करण्याआधी या 5 महत्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे:-
1) Niche selection.
2) Choosing the right blogging platform.
3) Learn basic graphic designing.
4) Learn basic SEO.
5) Backup content.
6) Research your target audience.
7) Plan your content.
8) Select the right domain name and hosting platform.
9) Develop your writing routine.
10) Prepare for monetization.
Conclusion:-
ब्लॉगिंग सुरु करताना नवीन ब्लॉगर वेबसाईट बनवायला अगदीच घाई करतात. त्यामुळे वेळ आणि पैसा वाया जाऊन त्यांनाच नुकसान सहन करावं लागतं. या काही गोष्टी ब्लॉगिंग सुरु करण्याआधी तुम्ही केल्या तर तुमच्यावर ब्लॉगिंग करताना जो ताण येतो तो कमी व्हायला मदत होईल. आशा आहे की आपल्याला आमचा हा ब्लॉग आवडला असेल. धन्यवाद.