How to start blogging without having a knowledge about any niche? - कोणत्याही niche बद्दल माहिती नसताना ब्लॉग सुरू कसा करायचा?

How to start blogging without having knowledge of any niche?

ब्लॉगिंगच्या सुरुवातीला Niche निवडणं कठीण असतं. कारण आपण नक्की कोणत्या विषयावर ब्लॉग लिहावा, किंवा आपण कोणत्या विषयावर चांगला ब्लॉग लिहू  याचा अंदाज लावणे ही कठीण असते. तसेच काहीवेळा एखादी niche आवडते पण त्याबद्दल जास्त माहिती नसल्याने आपण त्या विषयाचा विचारही करत नाही. 

पण तुम्हाला माहितीये का की तुम्ही ही आता एखाद्या niche बद्दल knowledge नसताना ही त्याविषयी article लिहू शकता. होय, हे शक्य आहे आणि खरं ही आहे. पण मग हे नक्की करायचं तरी कसं? हे आता आपण जाणून घेऊयात. 

How to start blogging without having a knowledge about any niche?

हा article खास त्या लोकांसाठी ज्यांना blogging करायचा आहे पण त्यांना कोणती Niche घ्यायची हे कळत नाही आणि ज्यांना एखाद्या Niche वर काम करायचा आहे, पण त्यांना त्याबद्दल माहित नाहीये. अशांसाठी आजचा हा आर्टिकल आपण लिहिलेला आहे. तर कोणत्याच विषयाबद्दल माहिती नसतानाही आर्टिकल कसा लिहायचा ते आपण पुढील मुद्द्यांमध्ये जाणून घेऊयात:- 

How do you start blogging without having knowledge of any niche?

1) Watch YouTube videos:- YouTube हे एक असं माध्यम आहे ज्यावर जवळपास सर्वच प्रकारची माहिती उपलब्ध आहे. तुम्ही ब्लॉगिंग साठी जो विषय निवडला आहे त्याबद्दल तुम्ही YouTube वर search करा, त्यानंतर तुम्हाला त्या विषयावरचे विविध व्हिडिओ मिळतील. ते पाहून तुम्ही माहिती घेऊ शकता, आणि त्या माहितीच्या आधारे तुम्ही आर्टिकल लिहू शकता. 

2) Read the blogs:- तुम्ही ज्या विषयावर blogging करणार आहात, त्या विषयावर आधीही कोणी ना कोणी स्वतःचा ब्लॉग हा सुरू केलाच असेल. याला आपण "प्रतिस्पर्धींचा ब्लॉग" किंवा "Competitors blog" असेही म्हणतो. तुम्ही जो विषय निवडला आहे त्याबद्दल तुम्ही गुगलवर शोधू शकता, तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे आर्टिकल दिसतील. ते वाचून तुम्ही तुमच्या विषयाबद्दलची माहिती घेऊ शकता, आणि त्या माहितीच्या आधारे तुम्ही त्या विषयावर आर्टिकलही लिहू शकता. 

3) Read books:- पुस्तकांद्वारे ही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान उपलब्ध होऊ शकतं. तुम्ही ज्या विषयावर आर्टिकल लिहिणार आहात त्या विषयासंबंधी तुम्ही पुस्तक वाचू शकता. पुस्तक हे माहिती घेण्यासाठी एक विश्वासार्ह साधन आहे. तुम्ही गुगल वरून E-books ही शोधू शकता. 

4) Don't worry about income:- ब्लॉगिंग च्या सुरुवातीलाच पैसे कमवले जातील अशी अपेक्षा करू नका. तुम्ही जो आर्टिकल लिहिणार आहात त्याबद्दल तुम्हाला माहिती नाहीये किंवा खूप कमी ज्ञान आहे. तसेच तुम्हाला त्या विषयात रसही आहे म्हणूनच तुम्ही तो विषय ब्लॉगिंग साठी निवडलेला आहे. सुरुवातीला तुम्हाला आर्टिकल कसा लिहिता येईल यावर लक्ष द्यायचं असून, तुमच्या वेबसाईटवर जास्तीत जास्त ट्रॅफिक कसे येईल याकडे लक्ष द्यायचं आहे. 

5) Practice and consistency:- जेव्हा तुम्ही या प्रकारचे आर्टिकल लिहिता, तेव्हा पहिल्या प्रयत्नातच जमेल असे नाही. अनेक चुका होऊ शकतात, गडबड होऊ शकते. आर्टिकल लिहिणे जमत नसते, शेवटी तुम्ही प्रयत्न करणं सोडून देता आणि त्या विषयावर आर्टिकल सोडता. यासाठी एक उपाय म्हणजे तुम्ही आर्टिकल लिहिण्यामध्ये सातत्य ठेवा तसेच जास्तीत जास्त सरावही करा. दिवसातून किमान दोन तरी आर्टिकल लिहिण्याचा प्रयत्न करा, म्हणजे एका महिन्यात तुमचे एकूण ६० आर्टिकल लिहून होतील. तुम्ही स्वतःला एक Challenge द्या, की एवढ्या दिवसात मला एवढे आर्टिकल लिहायचे आहेत. त्यानंतर तुमचा पहिला आर्टिकल पहा, आणि आणि शेवटचा आर्टिकल पहा त्यात तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. अशाप्रकारे तुम्ही प्रयत्न आणि सातत्य ठेवून ज्या विषयाबद्दल तुम्हाला माहिती नाहीये त्या विषयावरही आर्टिकल लिहू शकता. 

6) Experiment with topics:- ज्यावेळी तुम्ही ब्लॉगिंग सुरू करता जिथे तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये कोणत्या विषयावर ब्लॉग लिहायचा ते माहीत नसतं अशावेळी तुमच्या कडे एक सुवर्णसंधीच असते की तुम्ही विविध विषयावर ब्लॉग लिहाल. उदाहरणार्थ तुम्ही मोबाईल या विषयावर ब्लॉग लिहीत असाल, तर तुम्ही मोबाईलचे प्रकार, best mobile for students, best mobile for work अशा विविध विषयावर ब्लॉग लिहू शकता. वेगवेगळे विषय घेतल्याने तुम्हाला दोन गोष्टी कळतील की तुम्हाला कोणत्या विषयात रस आहे? कोणत्या विषयावर तुम्ही चांगला ब्लॉग लिहू शकता? आणि कोणते विषय तुमच्या वाचकांना आवडतात ते. यावरून तुम्ही वाचकांची आणि तुमची आवड लक्षात घेऊन विषय निवडून ब्लॉग सुरू करू शकता. कारण तुम्ही तुमच्या नावडतीचा विषय घेतला तर तुम्ही सुरुवातीला तर ब्लॉग लिहाल परंतु तुम्ही तो दीर्घकाळ तितक्याच सातत्याने लिहू शकाल की नाही याची शाश्वती नाही. 

7) Focus on problem solving:- ज्यावेळी तुम्ही ब्लॉगिंग सुरू करता तेव्हा तुम्हाला फक्त एवढाच विचार करायचं नसतो की तुम्हाला कोणत्या विषयावर ब्लॉग लिहायला आवडतो ते. तुम्ही ब्लॉगिंग जरी पैसे कमवण्यासाठी करत असाल, तरी वाचकांच्या समस्या सोडवणे हा त्या मागचा मुळ उद्देश्य असतो. तुम्ही कोणता ही विषय निवडाल, पण त्या विषयासंबंधी तुमच्या वाचकांना कोणकोणत्या समस्या येत आहेत याचा ही विचार करा. यामुले तुम्ही प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये किती चांगले आहात हे तर कळेलच, त्यासोबत तुम्हाला ब्लॉगिंगसाठी नवीन नवीन कंटेंट आयडिया ही मिळतील तसेच ब्लॉगवर वाचकांची संख्या वाढवायला ही मदत होईल. 

8) Learn and research as you go:- ब्लॉगिंग सुरू करण्याआधी विषयाचं संशोधन करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. ब्लॉगिंगसाठी विषय निवडणं हे अत्यंत गरजेचं असतं, एक विशिष्ट काळासाठी तुम्ही प्रयोग करू शकता पण कालांतराने तुम्हाला तुमचा एक पक्का विषय निवडावा लागेल. ज्यावेळी तुम्ही तो विषय निवडाल तेव्हा तुम्हाला त्या विषयाबद्दल सखोल संशोधन करावे लागेल. हे संशोधन करता करताच तुम्ही नवीन गोष्टी शिकाल. या गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही त्या विषयासंबंधी विडियो बघा, बातम्या असतील तर त्या वाचा, किंवा त्या विषयासंबंधी आर्टिकल वाचा. इंटरनेटवर तुम्हाला मोफत बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहे ज्यावरून तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकू शकता. 

9) Leverage social media:- तुम्ही ब्लॉगिंग करायचं ठरवलं, तुम्ही विविध विषयांवर ब्लॉग लिहून तुमच्या आवडतीचा विषय ही निवडला. त्यासोबतच तुम्ही नवनवीन गोष्टी ही शिकलात, आता राहिली आहे ती एक गोष्ट आणि ती म्हणजे सोशल मीडियावर तुमचा ब्लॉग ग्रो करणं. ब्लॉगिंग करताना तुम्हाला सोशल मीडिया वर तुमचा ग्रो करणं हे तुमच्या चांगल्या कमाईसाठी अत्यंत महत्वाचं आहे. यासाठी तुम्ही WhatsApp, Facebook, Instagram, Twitter, Quora यासारख्या सोशल मीडियावर तुमचे ब्लॉग शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त वाचकांपर्यंत तुमचा ब्लॉग पोहोचेल. यासोबतच तुम्ही ब्लॉगिंगचे विविध ग्रुप किंवा कम्यूनिटी सोबत जोडू शकता व तिथून तुम्ही ब्लॉगिंग व तुमच्या blogging niche बद्दल माहिती घेऊ शकता.   

10) Optimize for search engine:- सोशल मीडियावरुन ब्लॉग शेअर करून तुम्ही जे ट्रॅफिक मिळवता त्याला Off page Seo म्हणतात. पण जर तुम्हाला दीर्घकाळात ब्लॉगिंग मधून चांगले पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला Seo बद्दल सखोल ज्ञान घेणं महत्वाचं आहे. ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला एका महत्वाच्या गोष्टीवर लक्ष देणं महत्वाचं आहे आणि ते म्हणजे On Page Seo शिकणे. यामध्ये तुम्हाला मुख्यत्वे keyword, trend, meta tag description इत्यादि गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल. यामुळे तुमच्या ब्लॉगवर organic page view भेटतील. 

या दहा गोष्टी तुम्ही तेव्हा नक्कीच करू शकता ज्यावेळी तुम्हाला तुमच्या blogging niche बद्दल काहीच माहिती नसेल.   

Conclusion:- 

माझा स्वतःचाही एक ब्लॉग आहे, त्या विषयाबद्दल मला फारशी काही माहिती नाहीये, आणि तरीही मी Article लिहीत आहे. त्यावर मला महिन्याला खूप चांगलं ट्रॅफिक येत आहे, आणि आता आर्टिकल लिहिणं ही मला जमत आहे. प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, माझी पद्धत अशी आहे. याचा उपयोग मला article लिहिताना झाला आहे, आशा आहे की तुम्हाला ही याचा नक्कीच उपयोग होईल. 

आमचा आर्टिकल आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आर्टिकल वाचण्यासाठी धन्यवाद. 
थोडे नवीन जरा जुने