What is travel blogging in Marathi.
travel blogging ही एक अशी blogging niche आहे ज्यात आपण लाखो रुपये ही कमवू शकतो. कारण की यात फक्त एक नाही तर कितीतरी पैसे कमावण्याचे मार्ग आहेत. माझ्यामते तरी आपण नेहमी असा ब्लॉगिंगचा विषय निवडावा ज्यात एकापेक्षा अनेक मार्गाने पैसे कमवता येतील. याचं कारण म्हणजे जरी एका मार्गाने पैसे नाही आले तरी इतर मार्गाने तरी पैसे येतील. तर आज आपण जाणून घेऊयात की travel blogging म्हणजे काय?
What is travel blogging in Marathi.
Travel blogging मध्ये तुम्हाला विविध ठिकाणच्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती द्यायची असते. यात तुम्ही कोणत्याही देशाबद्दल, राजयबद्दल किंवा जिल्हयाबद्दल लिहू शकता. हे ठिकाण फिरायला उत्तम का आहे? इथे पाहण्यासारखी आणखीन कोणती ठिकाणे आहेत? राहण्याची आणि जेवणाची सोय कशी आहे? खर्च किती येतो? इत्यादि बद्दल माहिती तुम्ही लिहू शकता. जर तुम्ही youtube वर video बनवणार असाल तरीतेवढ्याच पैसे कमवण्याच्या संधी आहेत, आणि जर तुम्ही आर्टिकल लिहिणार असाल तरीही तेवढ्याच संधी उपलब्ध आहेत. तर चला आपण travel blogging बद्दल आणखीन काही गोष्टी जाणून घेऊयात.
Evolution of travel blogging:- travel blogging चा विचार केला तर सुरुवातीला जास्त editing app नसायचे म्हणून लोकं vlog सारखे विडियो बनवून you tube ला टाकत असत. travel blogging ही मुख्यतः youtube वर केली जात व ती आत्ता ही मोठ्या प्रमाणात होते. travel blogging तुम्ही ब्लॉगर किंवा WordPress वर ही करू शकता, तुम्हाला ज्या प्रकारे आवडेल त्या प्रकारे तुम्ही ब्लॉगिंग करू शकता. हा एक असा ब्लॉगिंगचा प्रकार आहे ज्यात तुम्ही विविध ठिकाणे फिरू ही शकता, नवीन गोष्टी ही जाणू शकता व याशिवाय तुम्ही विविध प्रकारे पैसे ही कमवू शकता. तुम्ही कसे पैसे कमवू शकता ते आपण आता बघूयात:-
How to make money from travel blogging?
1) ADS earning:- यात मी फक्त ads म्हणलं आहे कारण google ads शिवाय इतर ही असे ad networks आहेत ज्याच्या ads दाखवून तुम्ही पैसे कामवू शकता. यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त traffic तुमच्या ब्लॉग वर आणायचे असते. Youtube ला तुम्ही Google AdSense जोडून ही पैसे कमवू शकता. तुम्ही जर लिखित स्वरूपात ब्लॉगिंग करणार असाल तरी त्यावरही तुम्ही Google AdSense च्या ads द्वारे पैसे कमवू शकता. Approval साठी तुम्हाला त्यांच्या Content Guidelines चे पालन करावे लागते.
2) Paid promotion:-Travel blogging चा विचार केला तर अनेक वस्तु तुम्हाला वापराव्या लागतात, जसे की camera, tripod, lights, shoes, इत्यादि. अशा वस्तु बनवणाऱ्या कंपन्या अशा लोकांच्या शोधात असतात जे अशा पद्धतीच्या वस्तूंच्या वापर करत असतील आणि; त्यांच्या कडे अशा प्रकारची audience असेल ज्यांना या गोष्टीत रस आहे. ज्या लोकांच्या ब्लॉगवर किंवा यूट्यूब वर जास्तीत जास्त engagement असेल अशा company या ब्लॉग किंवा यूट्यूब चॅनेल सोबत संपर्क साधून त्यांना त्यांच्या वस्तूंची जाहिरात करायला सांगतात. या जाहिरातीसाठी कंपनी त्या व्यक्तीला काही प्रमाणात पैसे देते. travel blogging करताना तुमच्या कडे अशा पद्धतीचे paid promotion करण्याची मोठ्या प्रमाणात संधी असते, याप्रकारे तुम्ही पैसे कमवू शकता.
3) Affiliate marketing :- जेव्हा तुम्ही paid promotion करता तेव्हा company स्वतः तुमच्याकडे जाहिरात करण्यासाठी येते. परंतु ज्यावेळी तुम्ही affiliate marketing करता त्यावेळी हे सर्वस्वी तुमच्यावर असते की तुम्हाला कोणत्या वस्तूची जाहिरात करायची आहे. विविध company जसे की amazon, flipkart इत्यादींचे स्वतःचे affiliate program आहेत. ज्यावेळी तुम्ही एखाद्या वस्तु बद्दल लिहिता, आणि तुम्हाला असं वाटतं की ही वस्तु विकली तर त्याचा फायदा आपल्याला ही व्हावा यासाठी तुम्ही amazon, flipkart वरुण त्या त्या वस्तूची affiliate link घेऊन ती तुमच्या विडियो किंवा आर्टिकल मध्ये promote करू शकता. ज्यावेळी कोणी तुमच्या लिंकवर क्लिक करून एखादी वस्तु घेईल तेव्हा तुम्हाला काही टक्के commission मिळतं, ते किती ते त्या त्या वस्तूवर अवलंबून आहे.
4) Freelance writing:- Freelance writing ला gig economy मध्ये अत्यंत महत्व आहे. ज्याप्रकारे तुम्ही एखादी वस्तु विकता त्याप्रमाणेच तुम्ही तुमचे कौशल्याचा वापर करून एखादा उत्तम आर्टिकल लिहू शकता. विविध ट्रॅवल company अशा व्यक्तीच्या शोधात असतात, ज्यांच्या मध्ये लिहिन्याचं कौशल्य आहे व लोक त्यांचे लिखाण आवडीने वाचतात. अशा व्यक्ती प्रत्येक आर्टिकल लिहिण्यासाठी काही प्रमाणात फी घेतात, ती किती ते ज्याच्या त्याच्या अनुभव व कौशल्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जर freelancing करायची असेल तर तुम्ही fiver, Upwork, इत्यादि websites वरुन freelancing साठी clients शोधू शकता.
5) Sell your own product and services :- तुम्ही इतर कंपनी साठी आर्टिकल लिहाल, त्यांच्या वस्तूंचं ही प्रमोशन कराल आणि त्याद्वारे पैसे ही कमवाल. पण एक गोष्ट इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की जितके दिवस तुम्ही तुमच्या ब्लॉगवर किंवा यूट्यूब वर काम करता तितकाच विश्वास तुमच्या वाचक व प्रेक्षकांच्या मनात निर्माण होतो. अशावेळी तुम्ही तुमचं स्वतःचं प्रॉडक्ट बनवू शकता, जसे की travel bag किंवा प्रवासासाठी वापरता येणारे कपडे इत्यादि. यासोबतच तुम्ही travel guide म्हणून ही स्वतःची service पुरवू शकता किंवा स्वतःची ट्रॅवल compony ही चालू करू शकता.
conclusion:-
Travel blogging करण्याआधी किती पैसे कमवता येतात याकडे सर्वच लोकं लक्ष देतात, परंतु त्याआधी ही तुम्हाला या विषयाबद्दल विविध प्रकारची माहिती घेणे महत्वाचे आहे,कारण जर तुम्हाला तुमच्या वाचकांना उत्तम प्रकारचा कंटेंट पोहोचवून त्यांची मदत करायची असेल तर विषयांचं संपूर्ण ज्ञान असणे महत्वाचे आहे. यामध्ये तुम्ही ठिकानाबद्दल लिहिताय तिथला इतिहास, भौगोलिक स्थिति इत्यादि प्रकारची माहिती असणे गरजचे आहे कारण तर आणि तरच वाचक तुमचा ब्लॉग पूर्णपणे वाचतील. तुम्ही travel blogging youtube वरही करू शकता, किंवा वेबसाइट बनवून ही.
तुम्ही ज्या नावाने तुमचा ब्लॉग बनवणार असाल त्याचा एक यूट्यूब चॅनेल तसेच instagram account बनवून त्याद्वारे ही तुमच्या ब्लॉगचे प्रमोशन करू शकता.
आशा आहे की तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल. धन्यवाद.