Introduction:-
ब्लॉगिंग म्हणलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त एक आर्टिकल लिहून तो पोस्ट केला की ब्लॉगिंग झाली. जर तुम्हीही ही या भ्रमात असाल तर आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ब्लॉगिंग जेवढी सोप्पी वाटते तेवढीच किचकट आहे. जर केवळ एक आर्टिकल रोज लिहून सहज कमाई होत असती तर आज प्रत्येक जण हा ब्लॉगर असतो.
एक successful blogger तोच असतो ज्याच्या कडे ब्लॉगिंग करण्याची skill असते. आणि या skills तुम्ही ब्लॉगिंग करताना किंवा त्या आधी ही शिकू शकता. मी ब्लॉगिंग सुरू केली तेव्हा या गोष्टी मला ही येत नव्हत्या, परंतु जस जसं मी ब्लॉगिंगला वेळ दिला, तस तशा मला या skills जास्त सोप्या वाटू लागल्या. या skills तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये आणि तुम्ही इतर जे ही काम कराल त्यासाठी उपयुक्त आहेत. आज आपण पाहुयात की 5 skills ज्या तुम्ही ब्लॉगिंग सुरू करण्याआधी शिकाव्यात.
5 skills to learn before starting your blog:-
1) Content writing:- content writing ही एक अशी skill आहे जी प्रत्येक क्षेत्रात वापरली जाते. तुम्ही जो काही आर्टिकल लिहिता तो ही एक content writing चा भाग आहे. यामध्ये तुम्ही असे आर्टिकल लिहू शकता जो वाचकांना आवडेल, वाचक तुमचा आर्टिकल शेवट पर्यन्त वाचेल म्हणजेच आर्टिकल engaging असावा. आर्टिकल मध्ये व्याकरणाच्या चुका नसाव्यात, आर्टिकल समजेल अशा भाषेत असावा. असा आर्टिकल लिहा की वाचकांना तो आवडला पाहिजे. या सर्व गोष्टी तुम्ही Content writing मध्ये शिकू शकता.
2) SEO:- Search Engine Optimization म्हणजे तुमच्या ब्लॉगची free marketing करणे होय. यामध्ये तुम्हाला keyword research, Off Page Seo, Technical Seo इत्यादि गोष्टी शिकाव्या लागतात. कारण SEO मूळे तुमच्या ब्लॉगवर जास्तीत जास्त ट्रॅफिक येऊन तुमची कमाई ही वाढते. SEO शिकल्यानंतर तुम्ही तुमचा ब्लॉग सुरू केला तर प्रत्यक्षपणे तुम्ही या गोष्टी शिकू शकता. यामुळे तुमच्या ब्लॉगिंग मध्ये ही फायदा होईल.
3) Social media marketing:- हा एक Off Page Seo चा च प्रकार आहे असं समजलं तर हरकत नाही. यामध्ये तुम्ही तुमच्या Social media वर जसे की instagram, Facebook यावर तुम्ही तुमच्या ब्लॉग संबंधित असा content post करू शकता ज्यामुळे तुमचे followers तुमच्या ब्लॉग वर तुमचे आर्टिकल वाचतील. थोडक्यात तुम्हाला Social media चा वापर करून तुमचा ब्लॉग promote करायचा आहे. Social media चा वापर करून ट्रॅफिक येण्यासाठी तुम्हाला तुमची Social media account जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचवता येईल हे शिकावे लागते. या गोष्टी तुम्ही Social media marketing मध्ये शिकू शकता.
4) Basic designing:- ब्लॉगिंग करताना तुम्हाला तुमच्या ब्लॉगसाठी logo, तसेच आर्टिकल मध्ये फोटो वापरावे लागतात. तुमचं thumbnail बघूनच वाचक तुमचा आर्टिकल वाचतील. यासाठी तुम्हाला basic graphic designing शिकणे आवश्यक आहे. तुम्ही graphic designing ही youtube वरच्या video बघूनही शिकू शकता.
5) Time management and planning:- ब्लॉगिंग करताना तुम्हाला एका वेळी अनेक गोष्टी कराव्या लागतात. ब्लॉगचे टॉपिक शोधणे, outline बनवणे, आर्टिकल लिहिणे, proofreading करणे, thumbnail बनवणे, Seo करणे. यामूळे तुम्हाला या सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्हाला वेळेचं योग्य करणे आवश्यक आहे. ही गोष्ट केवळ ब्लॉगिंगसाठीच नाही तर तुमच्या आयुष्यात ही उपयोगी असणार आहे.
Conclusion:-
या पाच skills अशा आहेत की ज्या तुम्ही ब्लॉगिंग करताना किंवा त्या आधी ही शिकू शकता. पण मला असं वाटतं की तुम्ही ब्लॉगिंग सुरू करण्याआधी या स्किल्स शिकल्या तर जेव्हा तुम्ही ब्लॉगिंग सुरू कराल तेव्हा तुमच्या प्रत्यक्ष ज्ञानात भर पडेल, या गोष्टी तुम्ही youtube वर ही शिकू शकता, अनेक free ani paid courses ही इंटरनेट वर उपलब्ध आहे. आशा आहे की तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल.