How to start blogging in regional language? स्थानिक भाषेत ब्लॉग कसा सुरू करावा?

 How to start blogging in regional language? 

Regional blogging करावी की International blogging करावी असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. याचं कारण ही एकच असतं की कोणत्या प्रकारच्या ब्लॉगवर जास्तीत जास्त ट्रॅफिक येतं व कोणत्या पद्धतीच्या ब्लॉगवरुन जास्तीत जास्त कमाई होते? पहा, या दोन्ही प्रकारच्या ब्लॉगिंगचे आपापले वेगळे असे स्थान आहे. त्यामुळे कोणत्या ब्लॉगिंगमध्ये जास्त फायदा आहे किंवा तुम्ही कोणती ब्लॉगिंग करावी याची मी तुलना करणार नाही. या आर्टिकल मध्ये आपण आपल्या भाषेत ब्लॉग सुरू करून त्याद्वारे विविध प्रकारे कसे पैसे कमवू शकता हे आपण पाहणार आहोत. चला तर आपण आपल्या आजच्या या विषयावर पुढे जाऊयात. 

How to start blogging in regional language



What is regional blogging? 

Regional blogging म्हणजे सर्वसाधारणपणे तुमच्या मातृभाषेत ब्लॉगिंग करणे होय. तुमची भाषा हिन्दी, मराठी, गुजराती, किंवा तमिळ असेल या भाषेत तुम्ही आर्टिकल लिहीत आहात, त्याच भाषेत तुम्ही तुमचं प्रमोशन ही करत आहात, एकूणच तुमच्या वेबसाइटवर तुमचं काम हे तुमच्या मातृभाषेत चाललं आहे यालाच आपण Regional blogging असे म्हणतो. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आपण आपल्या मातृभाषेत काम का करावं? यात खरंच वाढ होते का? तर याचं उत्तर आहे हो! स्थानिक किंवा मातृभाषेत ब्लॉगिंग करण्याचा हा फायदा आहे की यात स्पर्धा कमी असते ज्यामुळे तुमचा ब्लॉग वाढायला मदत होते. यासोबतच ब्लॉग लिहायला फारशा अडचणी येत नाहीत, कारण तुम्ही तुमच्या भाषेत लिहीत आहात. हे झाले Regional blogging चे फायदे. आता आपण पाहुयात की तुम्ही Regional blogging कशी सुरू कराल. 

How to start a regional blog? Here is simple guide for you! 

  1. Know your niche:- ब्लॉगिंग सुरू करताना तुम्हाला कोणत्या विषयावर ब्लॉग लिहायचा आहे हे माहीत असणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण यामुळेच तुम्हाला तुमच्या ब्लॉगद्वारे कसे पैसे कमवायचे आहेत हे कळेल. ब्लॉगिंगसाठी विषय निवडणे हे सोप्पे आहे पण तुम्हाला यासाठी वेळ द्यावाच लागेल. विषय निवडताना तुम्ही आधी हे पहा की तुम्ही कोणत्या विषयावर चांगलं लिहू शकता? असे एकूण ५ ते १० विषय तरी निवडा. प्रत्येक विषयावर किमान ५ आर्टिकल लिहा, आणि पहा की कोणत्या विषयावर लिहायला तुम्हाला आवडत आहे ते. जो वर तुम्हाला विषय आवडणार नाही, तो वर तुम्ही त्या ब्लॉगवर काम कितपत कराल हे सांगता येणार नाही. यासोबतच तुम्ही त्या विषयासंबंधित इतर लोकांचे आर्टिकल वाचा यावरून तुम्हाला त्या विषयाबद्दल आणखीन माहिती मिळेल, व वाचकांना नेमकं काय आवडत आहे हे ही कळेल.       
  2. Research about your niche and gather information:- ज्यावेळी तुम्ही तुमच्या ब्लॉगिंगसाठी विषय निवडता त्यावेळी तुम्ही तुमचा पहिला आर्टिकल कशावर आहे हे ठरवा. ते ठरवल्यानंतर तुम्ही त्या बद्दल संशोधन करा  त्याची आणखीन माहिती घ्या. यासाठी अर्थातच तुम्ही इतर आर्टिकल ही वाचू शकता व यासोबतच तुम्ही यूट्यूब चा ही वापर करू शकता. आर्टिकल विषयी सर्व माहिती मिळवल्यानंतर आर्टिकलचा एक आराखडा तयार करा व आर्टिकल लिहायला सुरुवात कर. सुरुवातीला तुम्ही आर्टिकल लिहाल तेव्हा अर्थातच थोड्या अडचणी येतील की कसं लिहायचं व काय लिहायचं ते. पण जसं जसं तुम्ही रोज लिहाल, तुम्हाला सवय होईल. अशा पद्धतीने संशोधन करून तुम्ही तुमचा पहिला आर्टिकल लिहाल.                                                 
  3. SEO:- या विषयावर मी आधी ही आर्टिकल लिहिले आहेत ते ही तुम्ही वाचू शकता, ब्लॉगिंग करताना तुम्ही ब्लॉगर किंवा WordPress दोन्ही वर ही ब्लॉगिंग करू शकता. ब्लॉगिंग करताना SEO च्या पद्धती या सारख्याच असतात. आता ज्यावेळी तुम्ही स्थानिक किंवा तुमच्या भाषेत ब्लॉगिंग करता तेव्हा तुम्ही जिथे राहता त्या राज्याची माहिती तुम्हाला असायला हवी. तुम्हाला हे माहीत असायला हवं की तुमच्या इथल्या लोकांना कोणत्या प्रकारचे आर्टिकल आवडतात, तुम्ही कोणताही विषय निवडा. परंतु त्या विषयाबद्दल जास्तीत जास्त माहिती घ्या, त्या संबंधित keyword शोधा आणि मग आर्टिकल लिहा. ब्लॉगचे प्रमोशन करण्यासाठी तुम्ही Instagram, Facebook, Twitter चा ही वापर करू शकता. ब्लॉग आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये फोटो ही वापरू शकता. 
Regional blogging करताना त्याच्या समोर असणारी आव्हाने जाणून घेणे ही महत्वाचे आहे, जसे की:- 

तुमचा वाचक वर्ग हा मर्यादित असेल, कारण तुम्ही ज्या भाषेतून ब्लॉग लिहीत असाल ती भाषा बोलणारे किंवा समजणारे कमी लोकं असतील तर कितपत ट्रॅफिक तुमच्या ब्लॉगवर येईल हे सांगता येत नाही. तुम्ही भाषा हिन्दी असेल तर मात्र तुम्हाला भरपूर प्रमाणात वाचक वर्ग मिळेल, परंतु मराठीसारखी भाषा जी केवळ एकाच राज्यात बोलली जात असेल अशा ब्लॉग वर इतर भाषेतील ब्लॉग असतील तर मात्र ट्रॅफिक कमी येऊ शकतं. परंतु ट्रॅफिक कोणत्या देशतून यावं हे आपल्या हातात नाही, त्यामुळे परदेशातील लोक ही आपले ब्लॉग वाचू शकतात. यासोबतच तुम्हाला सातत्य ही ठेवावं लागेल, जेणकरून तुमचा ब्लॉग वाढेल. 

Monetization:- 

पैसे कमवण्याचे इथे सर्वसाधारणच मार्ग आहेत, ते पुढीलप्रमाणे:- 

१)ADS:- तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की तुम्ही google AdSense च्या adds द्वारे पैसे कमवू शकता. ज्यावेळी तुमचा ब्लॉग AdSense द्वारे approve होईल तेव्हा तुम्ही पैसे कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला Google च्या content guideline चे पालन करावे लागेल, जे तुम्ही त्यांच्या वेबसाइटवरुन पाहू शकता.  तुमच्या वेबसाइटवर लागलेल्या ads वर किती लोक click करतात आणि किती जण ती ad पाहतात यावर तुमची कमाई सर्वस्वी अवलंबून आहे. ads द्वारे पैसे कमवायचे असतील तर तुम्ही Eozoic चा ही वापर करू शकता, हे ही AdSense प्रमाणेच काम करू शकता. 

२) Collaboration:- ज्या वेळेला तुम्ही स्थानिक भाषेत ब्लॉगिंग करता त्यावेळेला शक्यता असते की तुम्हाला तुम्ही ज्या भागात राहता तिथून मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक येईल. अशा वेळी तुम्ही तुमच्या भागात राहणारे जे कोणी व्यापारी असतील, किंवा ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे अशा लोकांना तुमच्या ब्लॉगबद्दल सांगू शकता. त्यांच्या व्यवसायाबद्दल जाहिरात तुम्ही तुमच्या ब्लॉगवरुन करू शकता. यासाठी तुम्ही त्यांच्या कडून काही प्रमाणात पैसे घेऊ शकता, किती घ्यावे हे सर्वस्वी तुमच्या ब्लॉगच्या ट्रॅफिक वर व engagement वर अवलंबून आहे. 

३)  Creating own product:- ज्यावेळी तुम्ही स्वतःचा ब्लॉग बनवता तेव्हा अर्थातच तुम्ही ब्लॉगिंगसाठी एक विषय निवडताच. जसे जसे तुम्ही आर्टिकल लिहिता तुमच्या वेबसाइटची त्या विषयासाठी ओळख निर्माण होते. जसे की मी ब्लॉगिंगबद्दल लिहित आहे तर माझी वेबसाइट ही ब्लॉगिंग या विषयासाठी ओळखली जाते. ज्यावेळी तुमच्या ब्लॉगची किंवा वेबसाइटची एक ओळख निर्माण होते, तेव्हा त्याबद्दल तुम्ही तुम्ही तुमचं स्वतःचं एक प्रॉडक्ट बनवू शकता. जसे की E-book, course, consultation इत्यादि प्रकारचे प्रॉडक्ट आणि सर्विस बनवून त्या तुम्ही विकू शकता. 

Conclusion:- 

स्थानिक भाषेत लिहिण्याचे अनेक फायदे आहेत. जसे की भाषा तुमच्या ओळखीची आहे, त्यामुळे काय आणि कसं लिहायचं यात अडचणी येणार नाही. यासोबतच स्पर्धा ही कमी असेल तर वेबसाइट rank करायला तुम्हाला सोप्पे जाईल, आणि ट्रॅफिक कोणत्या देशातून यायला हवं हे आपल्या हातात नाही त्यामुळे तुमच्या ब्लॉगवर परदेशी वाचक ही येऊ शकतात. केवळ AdSense द्वारे च नाही तर विविध मार्गाने तुम्ही पैसे कमवू शकता. एकूणच हा समज चुकीचा आहे की केवळ इंग्रजीमध्येच ब्लॉग लिहून भरपूर कमाई होते. तुम्हाला यामध्ये SEO बद्दल जाणून घेणे गरजेचे आहे कारण भाषा जरी एक असली तरी SEO च्या पद्धती मात्र सारख्याच आहेत. 

आशा आहे की तुम्हाला आमचा हा आर्टिकल आवडला असेल. धन्यवाद! 



थोडे नवीन जरा जुने