Home page

Welcome to the Marathi blogger! 


 मराठी ब्लॉगर मध्ये आपलं स्वागत आहे. मला माहीत आहे की सर्वांनाच पैसे कमवायचे आहेत. कारण पैशाशिवाय आपण आपल्या गरजा भागवू शकत नाही. ब्लॉगिंग कोणासाठी full time career असेल किंवा कोणासाठी part time. पण ब्लॉगिंगमधल्या मूलभूत गोष्टी शिकणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी ब्लॉगिंग सुरू केली तेव्हा एक गोष्ट जाणवली की माझ्या प्रश्नांची उत्तरं कोणी माझ्या भाषेत देतच नाही. आणि देणारे ही कमी आहेत. म्हणूनच मी हा ब्लॉग चालू केला. 

या ब्लॉगमध्ये आपण काय पाहणार आहोत, आणि तुम्ही हा ब्लॉग का वाचवा? याची उत्तरं पुढीलप्रमाणे:- 

  • ब्लॉगिंगमधल्या मूलभूत शंकांच समाधान. 
  • असे विषय जे कोणी मराठी मध्ये मांडले नाहीत. 
  • आपल्या मराठी भाषेतच शंका सोडवल्या जातील. 
  • नवीन ब्लॉगरला मदत होईल, त्यांचा ब्लॉग ग्रो होईल अशा टिप्स पुरवल्या जातील. 
  • जास्तीत जास्त मराठी आणि त्यातही नवीन ब्लॉगर्सला सहकार्य करण्याचा उद्देश्य. 

आमचा उद्देश्य एकच आहे की मराठी ब्लॉगिंगला पुढे आणायचं, आणि आपल्या भाषेत काम करून पैसे कमवायचे. 
आशा आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करून जास्तीत जास्त ब्लॉगर्सपर्यन्त आमचा ब्लॉग पोहोचवाल. 

धन्यवाद!